मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेला जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू परवेझ रसूल चांगल्याच संकटात सापडला आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेने त्याच्यावर रोलर चोरी केल्याचा आरोप ठेवला असून, तो रोलर परत न केल्यास पोलिस कारवाईस तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य संघटनेने पाठवली नोटीस
जम्मू-काश्मीर संघटनेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवेझ रसूल याला नोटीस पाठवली. संघटनेचा रोलर लवकरात लवकर परत न केल्यास पोलिस कारवाईसाठी तयार राहण्याचे या नोटिशीमध्ये सांगण्यात आले आहे.
रसूलने केले आरोपांचे खंडन
आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना रसूल म्हणाला,
“मला एक पत्र मिळाले आहे, की मी संघटनेकडून रोलर घेतला आहे. मी स्पष्ट करतो की, मी संघटनेकडून कोणताही रोलर किंवा मशीन घेतलेले नाही. जम्मू-काश्मीर क्रिकेटला जीवन आणि आत्मा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूशी तुम्ही असे कसे वागू शकता?”
जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेने या प्रकरणावर बोलताना स्पष्टीकरण देताना म्हटले,
“आम्ही केवळ रसूलच नव्हे तर सर्व जिल्हा संघटनांना ई-मेल पाठवला आहे. ज्यांनी संघटनेकडून यंत्रसामग्री नेली आहे. त्या सर्वांची यादी आमच्याकडे असून त्यानुसार हे मेल पाठवले गेले आहेत. संघटनेचे लेखापरिक्षण होणार असल्याने त्याचा ताळमेळ बसवण्यासाठी प्रक्रियेअंतर्गत आम्हाला हे मेल पाठवावे लागले.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे रसूल
परवेझ रसूल याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो जम्मू-काश्मीरचा एकमेव क्रिकेटपटू असून, मागील सहा वर्षांपासून तो जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार म्हणून काम पाहतो. त्याने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व कोलकाता नाईट रायडर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला सलग दोन वर्ष बीसीसीआयचा सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून गौरवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
किती हा क्रूरपणा!! या भारतीय गोलंदाजाच्या फोटोचे अंडरसनने केले तुकडे-तुकडे, व्हिडिओ झाला व्हायरल
तालिबान संकटानंतरही पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळणार अफगाणिस्तान, ‘या’ देशात होणार सामने