---Advertisement---

“जो रूट कारकिर्दीतील सर्वोत्तम लयीत, पण आमच्या पाठिब्यांची नितांत गरज आहे”

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या हेडिंग्ले येथे सुरू आहे. दोन्ही संघ पूर्ण तयारीसह या सुंदर मैदानावर उतरले आहेत. भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर असताना, यजमानही या सामन्यात मालिकेत बरोबरीत येण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने चाहत्यांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केले आहे. कारण त्याने या मालिकेत आतापर्यंत दोन शतके केली आहेत.

इंग्लंडच्या फलंदाजीबद्दलही बरीच चर्चा होताना दिसतेय. केवळ रूटच फलंदाजीतून चमकत आहे आणि उर्वरित फलंदाजांना अजूनही सूर गवसत नाहीये. रूटचा सहकारी आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने यावर आपले मत व्यक्त केले आहे.

बटलर म्हणाला की, “रूट नेहमी चांगला खेळतो. पण सध्या तो त्याच्या आयुष्याच्या सर्वात चांगल्या लयीत आहे आणि म्हणूनच इंग्लंडच्या सर्व फलंदाजांनी त्याला किमान मदत करण्यासाठी खेळपट्टीवर टिकण्याची गरज आहे. हे स्पष्ट दिसत आहे की, तो अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन करत आहे,.पण उर्वरित संघाकडून त्यास पाठिंबा आवश्यक आहे. तो नेहमीच चांगली फलंदाजी करत आलाय आणि सध्या तो त्याच्या सर्वोच्च लयीत आहे.”

बटलर पुढे म्हणाला, “त्याने या मालिकेत फलंदाजीची जबरदस्त सुरुवात केली आहे आणि मला आशा आहे की, तो ती पुढे चालू ठेवेल. यात त्याच्यासोबत मजबूतीने उभे राहण्यासाठी इतर फलंदाजांनी आपली फलंदाजी सुधारणे आवश्यक आहे. इंग्लंड संघ कर्णधार रूटवर आणखीन अवलंबून राहू शकत नाही. त्याच्यावर दबाव टाकणे हे संघासाठी धोकादायक ठरेल. आम्ही एक संघ म्हणून त्याच्यासोबत उभे राहणे गरजेचे आहे.”

यष्टीरक्षकाने पुढे म्हटला की, “लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अप्रतिम फटकेबाजी केली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात आम्ही त्यांच्याविरुद्ध योजना आखल्या आहेत.”

दुसऱ्या कसोटीत बुमराहने नाबाद 34 तर मोहम्मद शमीने नाबाद 56 धावा केल्या होत्या. दोघांनी नवव्या विकेटसाठी 89 धावांची नाबाद भागीदारी केली होती. यामुळे भारताने लॉर्ड्सच्या मैदानावर 151 धावांनी दुसरी कसोटी जिंकली होती. भारताने इंग्लंडला दुसऱ्या डावात 120 धावांवर गुंडाळले होते. भारत सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

लाॅर्ड्सचे हिरो हेडिंग्लेवर ठरले ‘झिरो’..! भारताचे ‘हे’ दोघे खेळाडू भोपळाही न फोडता तंबूत माघारी

त्याला स्वत:च्या रंगात रंगलेले पाहून आनंद झाला, तो डोळ्यांत डोळे घालून खेळणारा गोलंदाज – विराट कोहली

पुजाराला दहाव्यांदा बाद करताच इंग्लिश प्रेक्षकांकडून ‘असे’ झाले ३९ वर्षीय अँडरसनचे कौतुक, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---