टी20 सामने म्हणजे मनोरंजनाची हमखास हमी, बघायला मिळणारी तुफान फटकेबाजी, चौकार-षटकारांची बरसात हे एक समीकरणच झालेले दिसून येते. फ्रेंजाईझ क्रिकेटचं पेव वाढल्यानंतर तर फलंदाजी अजूनच बहरत गेली आणि फलंदाज अधिकाधिक जबरदस्त प्रदर्शन करू लागलेत. अशीच एक खेळी व्हिटॅलिटी टी20 ब्लास्ट स्पर्धेत पाहायला मिळाली.
इंग्लडच्या जो क्लार्कने या व्हिटॅलिटी ब्लास्ट स्पर्धेच्या नॉर्थम्प्टनशायर संघाविरुद्ध नॉटिंगमशायर संघाकडून खेळतांना धुव्वाधार फलंदाजी केली. क्लार्कने 65 चेंडूत 6 चौकार आणि तब्बल 11 षटकारांच्या मदतीने 136 धावा केल्या आणि चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले.
जो क्लार्कने केलेल्या या 136 धावा या कोणत्याही फलंदाजाने टी20 ब्लास्ट स्पर्धेत केलेल्या सहाव्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा आहेत. याव्यतिरिक्त तो नॉटिंगमशायरकडून सर्वोच्च धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे. त्याने आपले शतक अतिशय खास प्रकारे पूर्ण केले . षटकार ठोकून दिमाखात त्याने आपले तिसरे टी20 शतक पूर्ण केले. तो इंग्लडंचा तिसरा असा फलंदाज ठरला ज्याच्या नावावर 3 टी20 शतकं आहेत. इंग्लंडसाठी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता टी20 क्रिकेटमध्ये 3 शतक करणारा तो पहिलाच इंग्लिश फलंदाज आहे.
जो क्लार्कने या खेळी दरम्यान पहिल्या 50 धावा फक्त 28 चेंडूत पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर 49 व्या चेंडूवर आपले तिसरे टी20 शतक पूर्ण केले. नॉटिंगमशायर संघाने जो क्लार्कच्या ताबडतोब शतकाचा विडिओ शेयर केला असून क्रिकेट चाहते त्याला मोठ्या प्रमाणात पसंद करीत आहे.
Joe Clarke, that is textbook.#BeMoreOutlaw pic.twitter.com/CZ8Sz92cbT
— Nottinghamshire CCC (@TrentBridge) June 13, 2021
क्लार्कच्या 136 धावांच्या मदतीने नॉटिंगमशायर संघाने 20 षटकात 7 बळी गमावून 214 धावांचे लक्ष उभे केले. त्याला प्रत्युत्तर देतांना नॉर्थम्प्टनशायर संघ 200 धावाच करू शकला. अशा प्रकारे नॉर्थम्प्टनशायर संघाला या सामन्यात 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नॉर्थम्प्टनशायर संघातर्फे सर्वाधिक धावा कर्णधार जोशुआ कॉबने केल्या. त्याने 32 चेंडूत 62 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
फाफ डू प्लेसिसला जखमी झालेले पाहून पत्नीने भावूक व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच केली ‘ही’ मागणी
टी२०मधील सर्वोत्तम पुनरामन? २० धावांवर ५ विकेट गमावूनही त्या संघाने २८ धावांनी जिंकला सामना