दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डू प्लेसिस सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. पीएसएलच्या सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिसला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर डू प्लेसिसच्या पत्नीने अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली आहे.
फाफ डू प्लेसिसची पेशावर जाल्मी विरुद्धच्या सामन्यादरम्यान चौकार रोखताना क्वेटा ग्लेडिएटर्सचा साथीदार मोहम्मद हसनन याच्याशी टक्कर झाली, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर फाफ डु प्लेसिसची पत्नी इमारी हिने आपत्कालीन परिस्थितीत संघांना एक यंत्रणा तयार करण्यास सांगितले आहे. डू प्लेसिसच्या दुखापतीबद्दल तिला पुरेशी माहिती पटकन कळाली नाही. त्यामुळे तिने ही मागणी केली आहे.
तिने डू प्लेसिसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने त्यांच्या २ मुलींसह घालवलेले काही क्षण आहेत. हा भाऊक व्हिडिओ शेअर करत ईमारीने लिहिले की,”मी एक पत्नी आणि आईच्या नात्याने सांगत आहे की, माझ्या व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. आम्ही एक प्रेक्षकांप्रमाणे बघत असतो.’
ईमारी पुढे म्हणाली की,”मला खूप वेळा नंतर समजले की, फाफला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. मला माहिती आहे की, ही अशी गोष्ट आहे जी सर्वच खेळाडूंसोबत होते. परंतु खेळाडूंच्या नातेवाईकांना त्याबद्दल तातडीने माहिती होणे गरजेचे आहे.”
इमारी म्हणाली की, “आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा स्थापित करणे आवश्यक आहे. हे फक्त क्रिकेटच नाही तर इतर खेळांमध्येही असायला हवे. मला या अगोदर कधीच इतके असहाय्य वाटले नाही. मला माहित आहे की यात कुणाचीही चूक नाही. परंतु जर आपात्कालीन संघटना असेल तर तातडीने जखमी खेळाडूंना मदत मिळू शकते.” (Faf du Plessis’ wife demanded the establishment of an emergency system)
फाफ डु प्लेसिस सध्या या दुखापतीतून सावरत आहे. त्याने ट्विट करत याबद्दल माहिती दिली होती, की त्याला थोडा त्रास होत आहे, पण या दुखापतीतून सावरत आहे. तसेच त्याने सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२०मधील सर्वोत्तम पुनरामन? २० धावांवर ५ विकेट गमावूनही त्या संघाने २८ धावांनी जिंकला सामना
अर्शदीप सिंग म्हणतोय, श्रीलंका दौऱ्यादरम्यान ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीला करायचे आहे इंप्रेस
क्रिकेट खेळणाऱ्या लहानग्या मुलीच्या व्हिडिओवर ‘अशी’ प्रतिक्रिया देत मिताली राजने जिंकली लाखो मनं