---Advertisement---

WPL 2024चा अंतिम सामना पावसामुळे वाया गेल्यास कोण ठरेल विजेता? वाचा सविस्तर

---Advertisement---

महिला प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रंगणार आहे. हा सामना रविवारी (17 मार्च) खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता या अंतिम सामन्याला सुरवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल. तसेच हा सामना तुम्हाला जिओ सिनेमा ऍप किंवा वेबसाईवरही मोफत पाहाता येणार आहे. 

याबरोबरच, दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यानंतर वूमन्स प्रीमियर लीगला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे.कारण गेल्यावर्षी या स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले होते. पण यंदा मुंबईला अंतिम सामना गाठता आलेला नाही. त्यामुळे दिल्ली आणि बेंगलोरला रविवारी पहिले विजेतेपद जिंकण्याची संधी असणार आहे.

अशातच डब्ल्युपीएलच्या नियमांमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच 16.11 नियमानुसार जर अंतिम सामना निर्धारित षटकांनंतर बरोबरीत सुटला, तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. दरम्यान पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली, तर दुसरी सुपर ओव्हर होईल, जोपर्यंत निकाल लागत नाही किंवा पंच निर्णय देत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे.

त्यानंतर समजा सामन्याला वेळ पुरेसा नसेल किंवा सामन्याचा निकाल लागू शकत नसेल, तर अशावेळी साखळ फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवलेल्या संघाला विजेता घोषित केले जाणार आहे. तसेच या नियमानुसार जर सामन्याचा निकाल लागला नाही, तर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवून थेट अंतिम सामना गाठलेला दिल्ली कॅपिटल्स संघ विजेता ठरेल.

दरम्यान, या दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकला, तरी त्या संघाच्या फ्रँचायझीचे हे पहिले विजेतेपदही ठरणार आहे. कारण या दोन्ही संघांच्या फ्रँचायझीला अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेली नाही.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-

रॉयल चॅलेंजरस् बेंगलोर – स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिवाईन, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादूर, इंद्राणी रॉय, शुभा सतीश, नादीन डी क्लर्क, सभिनेनी मेघना, केट क्रॉस, एकता बिश्त.

दिल्ली कॅपिटल्स – मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझन कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे, मिन्नू मणी, अश्वनी कुमारी, अपर्णा मंडल, तितास साधू, स्नेहा दीप्ती , ॲनाबेल सदरलँड, लॉरा हॅरिस, पूनम यादव.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---