इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कालपासून(12 सप्टेंबर) ऍशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 8 बाद 271 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून काल कर्णधार जो रुटने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने खास पराक्रम केला आहे.
जो रुटने कसोटीमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या आता कसोटीत 86 सामन्यात 7022 धावा झाल्या आहेत. त्याचबरोबर तो कसोटीमध्ये 7000 धावांचा टप्पा पार करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याने जेव्हा 7000 धावांचा टप्पा पार केला तेव्हा त्याचे वय 28 वर्षे 256 दिवस एवढे होते. या यादीत त्याच्यापुढे केवळ ऍलिस्टर कूक आणि सचिन तेंडूलकर आहेत. कूकने 27 वर्षे 346 दिवस एवढे वय असताना कसोटीमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला होता. तसेच सचिनने 28 वर्षे 193 दिवस एवढे वय असताना 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.
रुटला काल 57 धावांवर पॅट कमिन्सने बाद केले. या सामन्यात इंग्लंडकडून पहिल्या डावात रुट बरोबरच जॉस बटलरनेही अर्धशतके केले आहे. बटलर पहिल्या दिवसाखेर 64 धावांवर नाबाद असून त्याच्याबरोबर जॅक लीच 10 धावांवर नाबाद खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्शने पहिल्या दिवसाखेर सर्वोधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत 7 हजार धावा करणारे सर्वात युवा क्रिकेटपटू –
27 वर्षे 346 दिवस – ऍलिस्टर कूक
28 वर्षे 193 दिवस – सचिन तेंडूलकर
28 वर्षे 256 दिवस – जो रुट
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज विरुद्ध हॅट्रिक घेत या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने रचला इतिहास
–एमएस धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या खोट्या, एमएसके प्रसाद यांनी केला मोठा खूलासा






