इंग्लंडचा दिग्गज कसोटी कर्णधार आणि फलंदाज जो रुट (joe root) याने मागच्या काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. रुटने त्यावेळी आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावात स्वतःचे नाव सामील करण्याची इच्छा बोलून दाखवलेली. परंतु ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव झाल्यानंतर रुटने त्याचा निर्णय बदलल्याचे दिसते. त्याच्यासोबत इंग्लंडचा प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्स हादेखील आगामी आयपीएल हंगामात सहभाग नोंदवणार नसल्याचे, वृत्त समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेत इंग्लंडचा ४-० असा पराभव मिळाल्यानंतर जो रुट व संघावर सर्व बाजूंनी टीका होत आहेत. मालिकेदरम्यान रूटने आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि मेगा लिलावात सहभागी होण्याचे संकेतही दिले होते. मात्र, आता त्याने स्वतःचा निर्णय बदलला आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, रुटची आयपीएलमध्ये खेळण्याची कसलीच इच्छा नाहीय आणि याच कारणास्तव तो मेगा लिलावात स्वतःचे नाव देखील सामील करणार नाही.
जगातील अव्वल अष्टपैलू म्हणून ओळखला जाणारा बेन स्टोक्स हा देखील आगामी मेगा लिलावात सहभागी होणार नाही. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. स्टोक्स सातत्याने आयपीएलमध्ये महागडा खेळाडू परत आला आहे. त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट व राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले होते.
गार्डियन स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आता जो रुट व बेन स्टोक्स २०२२ मेगा ऑक्शनच्या ड्राफ्टमध्ये स्वतःला सहभागी करणार नाही. यापूर्वी रूटने आयपीएलमध्ये सहभाग घेण्यासाठी एक अट सांगितले होती. जर त्याच्या कसोटी प्रदर्शनावर याचा कसलाही परिणाम होणार नसेल, तर तो आयपीएल खेळेल, असे रुट म्हटला होता. तसेच तो स्वतःला इंग्लंड संघासाठी कमीत कमी कसोटी प्रकारामध्ये नेहमी उपलब्ध ठेऊ इच्छितो, कारण त्याला कसोटी क्रिकेट खूप आवडते.
आयपीएलचे आतापर्यंत १४ हंगाम खेळले गेले आहेत, पण रुट आतापर्यंत एकाही हंगामात खेळला नाही किंवा त्याने लिलावातही सहभाग घेतला नाही. यापूर्वी त्याने कधी आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा देखील व्यक्त केली नव्हती, पण यावेळी त्याने ही इच्छा बोलून दाखवलेली. तसेच त्याचा सहकारी मार्क वूड देखील आयपीएलमध्ये खेळू इच्छितो. अशात आता हे पाहावे लागणार आहे की, आयपीएलच्या मेगा लिलावात रुट सहभाग घेईल की यावर्षीही या स्पर्धेपासून लांब राहील.
महत्वाच्या बातम्या –
“हा विराटने बनविलेला संघ, त्यामुळे…” विश्वविजेत्या खेळाडूची रोचक प्रतिक्रिया
ठरलं बर का! या दिवशी ‘हिटमॅन’ पुन्हा दिसणार निळ्या जर्सीत
खुद्द रोहितच कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लावण्यात बनतोय अडथळा, पण कसं? वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –