भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या तळाच्या फळीतील फलंदाजांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारतीय संघ पुन्हा एकदा मजबूत स्थितीत पोहोचला आहे. दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी आता ३६८ धावांपेक्षा आहे आणि अशा स्थितीत सामना वाचवण्याचा दबाव यजमानांवर आला आहे. पहिल्या डावात तडाखेबंद अर्धशतक झळकावणाऱ्या शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा भारताचा घसरलेला डाव सावरला आणि दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावत यजमानांच्या हातातून सामना दूर नेला.
दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत शार्दुल ठाकूरने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि सामन्यातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. शार्दुलच्या या झंझावाती खेळीदरम्यान, इंग्लिश कर्णधार जो रूट पूर्णपणे असहाय्य दिसला आणि सतत मैदानातील क्षेत्ररक्षणात बदल करत राहिला. शार्दुलने ज्याप्रकारे त्याच्या डावात स्ट्रेट ड्राइव्ह मारले, त्याने रूटला अनेक वेळा क्षेत्ररक्षण बदलण्यास भाग पाडले.
शार्दुलच्या सततच्या सरळ ड्राईव्हमुळे त्रस्त झालेल्या इंग्लिश कर्णधार जो रूटला दोन क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाच्या अगदी जवळ उभे करावे लागले. जेणेकरून शार्दुल समोर सहज चौकार मारू शकणार नाही. पण शार्दुलला या क्षेत्ररक्षणाचा काही फरक पडला नाही. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या दिशेने चौकार आणि षटकार ठोकण्यास सुरुवात केली.
No.10 – God of cricket and Lord of cricket https://t.co/ZXw54doYay
— Vishal (@Vishalas18) September 5, 2021
Shardul counter-attacks England in style and races to his 50 with a pull over square leg for 6.
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Shardul pic.twitter.com/pzGbUPnUI8
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 2, 2021
७२ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ६० धावांची तूफानी खेळी केली.
तत्पूर्वी, भारताने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्माने जबरदस्त १२७ धावांची खेळी केली. केएल राहुलने ४६ धावा करून त्यास चांगली साथ दिली. चेतेश्वर पुजाराने संयमी अर्धशतक करत ६१ धावा केल्या. कर्णधार विराटने ४४ धावा केल्या. रवींद्र जडेजाने १७ धावा केल्या तर अजिंक्यने पुन्हा निराशा करत भोपळाही न फोडता तंबूत परतला. रिषभ पंत (५०) आणि शार्दूल ठाकूर (६०) यांनी दमदार अर्धशतक करत आघाडी ३०० पार नेली. बुमराह (२४) आणि उमेश यादवने (२५) फटकेबाजी करत झटपट धावा केल्या. अशाप्रकारे भारताने इंग्लंडला विजयासाठी ३५० पेक्षा जास्त धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शतक झळकावल्यानंतर ‘हिटमॅन’ रोहितला ओव्हलच्या मैदानावर मिळाला विशेष सन्मान, पाहा फोटो