पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट याने मोठा विक्रम केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने यजमान पाकिस्तान संघाला 74 धावांनी पराभूत केले होते. तर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली. दुसऱ्या डावात त्याने पाकिस्तानचा फलंदाज फहीम अशरफ याला बाद करत हा विक्रम केला.
जो रुट (Joe Root) इंग्लंडचा दिग्गज फलंदाज असून वनडे आणि टी-20 फॉरमॅटच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे प्रदर्शन अधिक चांगले राहिले आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने एकूण 96 धावांचे योगदान दिले, तर दुसऱ्या कसोटी रुट दोन्ही डावांमध्ये मिळून 29 धावा करू शकला. दुसऱ्या कसोटीत फलंदाजाच्या रूपात त्याला खास काही करता आले नाही, मात्र एक मोठा विक्रम मात्र नावावर केला. रुट आता कसोटी क्रिकेटमध्ये 10000 पेक्षा जास्त धावा आणि सोबतच 50 विकेट्सचा टप्पा पार करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि स्टीव वॉ (Steve Waugh) यांनी केली होती.
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज जॅक कॅलिस (Jacques Kallis) याने कसोटी क्रिकेटमध्ये 13289 धावा केल्या असून 292 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज स्टीव वॉ (Steve Waugh) यांनी कसोटी कारकिर्दीत 10927 धावा केल्या, तर गोलंदाजाच्या रूपात 92 खेळाडूंना तंबुचा रस्ता दाखवला. रुट या दिग्गजांच्या यादीत नव्याने सहभागा झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रुटच्या नावावर 10629 धावांची नोंद आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने कारकिर्दीतील 50 वी कसोटी विकेट देखीव घेतली.
कसोटी क्रिकेटमध्ये 10000 पेक्षा जास्त धावा आणि 50+ विकेट्स घेणारे खेळाडू
जॅक कॅलिस
स्टीव वॉ
जो रुट
दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील या दुसऱ्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर मुलतानमध्ये ही लढत सुरू आहे. पहिल्या डावात इंग्लंडने 281, तर पाकिस्तानने 202 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंड संघ 275 धावा करू शकला आणि यजमानांना विजयासाठी 355 धावांचे लक्ष्य दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात 4 बाद 198 धावा केल्या. (Joe Root became the third player to score more than 10,000 runs and take at least 50 wickets in Test cricket.)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि युवराजचे ते स्वप्न अधूरेच राहिले!
‘संधी मिळत नसली तरी भारताकडूनच खेळणार’, आयर्लंड क्रिकेटच्या प्रस्तावाला संजू सॅमसनकडून नकार