नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर सलग सातवी नाणेफेक गमावली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय संघाने या सामन्यात सुरुवात उत्कृष्ट केली आहे. मात्र, कर्णधार जो रूटने शानदार अर्धशतकी खेळी करत इंग्लंड क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
रूट बनला सर्वात यशस्वी फलंदाज
नॉटिंघम कसोटीच्या पहिल्या सत्रात इंग्लंड खराब सुरुवात केली. परंतु कर्णधार जो रूटने शानदार अर्धशतक खेळी करत संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान त्याने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणारा इंग्लिश फलंदाज होण्याचा मान मिळवला.
जो रूटने इंग्लंडसाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपला २९० वा डाव खेळताना १५,७६८ (डाव सुरू आहे) धावा बनविल्या आहेत. यापूर्वी इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार ऍलिस्टर कूकच्या नावावर होता. त्याने २५७ सामन्यात १५,७३७ धावा काढण्याची कामगिरी केली होती.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी केविन पीटरसन असून त्याने २७५ डाव खेळताना १३,७७९ धावा बनवल्या होत्या. इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे इयान बेल व ग्रॅहम गूच यांचा क्रमांक लागतो.
Congratulations to @root66 on becoming England's leading run-scorer in international cricket 👏#ENGvIND | #WTC23 pic.twitter.com/kprJ1wUzhf
— ICC (@ICC) August 4, 2021
अशी आहे रूटची कारकीर्द
सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या जो रूटच्या एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी बोलायचे झाल्यास त्याने १०५ कसोटीमध्ये ४८.६८ च्या शानदार सरासरीने ८७१४ धावा बनविल्या आहेत. त्यामध्ये २० शतकांचा व ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. १५२ वन डे सामन्यात त्याच्या बॅटमधून ५१ च्या लाजबाब सरासरीने ६१०९ धावा निघाल्या आहेत. जवळपास दोन वर्षापासून टी२० संघात समाविष्ट नसलेल्या रूटने आतापर्यंत ३२ सामन्यात ८९३ धावा जमविलेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दिलदार विराट! छोट्या चाहत्याला ‘खास’ भेटवस्तू देत कोहलीने जिंकली चाहत्यांची मने
वेस्ट इंडिजसाठी पाऊस बनला खलनायक, पाकिस्तानने जिंकली टी२० मालिका