---Advertisement---

कर्णधार म्हणून फ्लॉप, पण फलंदाज म्हणून सुपरहिट! ‘हा’ कारनामा करणारा जो रूट तिसराच फलंदाज

Joe-Root
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम कामगिरी करत १ डाव आणि १४ धावांनी विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेत ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभव स्विकारावा लागला असला, तरी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मोठा विक्रम करत दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट यावर्षी कर्णधार म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. मायदेशात असो किंवा परदेशात त्याला इंग्लंड संघाला मालिका जिंकून देता आली नाहीये. परंतु, फलंदाज म्हणून तो सुपर हिट ठरला आहे. त्याने मायदेशात आणि परदेशात जाऊन गोलंदाजांवर आक्रमण करत मोठ्या धावा केल्या आहे. तो ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या (२८ डिसेंबर) दिवशी बाद होताच कसोटी क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. (most runs in a calender year)

जो रूटने यावर्षी १५ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ६१.०० च्या सरासरीने १७०८ धावा केल्या आहेत. एका वर्षात १७०० कसोटी धावांचा टप्पा पार करणारा तो मोहम्मद युसूफ आणि सर विव रिचर्ड्सनंतर तिसराच फलंदाज ठरला आहे. मोहम्मद युसुफने २००६ मध्ये १७८८ धावा केल्या होत्या, तर सर विव रिचर्ड्स यांनी १९७६ मध्ये १७१० धावा केल्या होत्या. त्याला सर विव रिचर्ड्स यांना या बाबतीत मागे टाकण्यासाठी २ धावा कमी पडल्या. तर मोहम्मद युसूफला मागे टाकून अव्वल स्थानी पोहचण्यासाठी त्याला ८० धावा कमी पडल्या.

त्याने ॲडीलेड कसोटीत १६०० धावांचा आकडा पूर्ण करत सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर सारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले. त्यानंतर त्याने ग्रॅमी स्मिथला मागे टाकत एकाच वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज 
१७८८ धावा – मोहम्मद युसुफ,२००६
१७१० धावा – सर विव रिचर्ड्स, १९७६
१७०८ धावा – जो रूट, २०२१*
१६५६ धावा – ग्रॅमी स्मिथ, २००८
१९९५ धावा – मायकल क्लार्क, २०१२

महत्वाच्या बातम्या :

अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट

”स्टोक्समध्ये ती बात राहिली नाही”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उडविली खिल्ली

हे नक्की पाहा : टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं |

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---