इंग्लंडचा जो रुट सध्या आपल्या फलंदाजीनं धमाल करत आहे. तो इंग्लंडसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला. त्याचबरोबर आता त्यानं फिल्डिंगमध्येही कमाल केली आहे.
जो रुटनं फिल्डिंगच्या बाबतीत दिग्गज राहुल द्रविडच्या खास क्लबमध्ये एंट्री केली. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 200 झेल पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा रुट जगातील केवळ चौथा खेळाडू बनला आहे. त्याच्या पूर्वी ही कामगिरी फक्त राहुल द्रविड, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांनी केली.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात जो रुटनं दोन्ही डावांमध्ये शतक ठोकलं. यासोबतच तो फिल्डिंगमध्येही संघासाठी योगदान देत आहे. इंग्लंडनं श्रीलंकेसमोर विजयासाठी 483 धावांचं लक्ष्य ठेवलं. धावांचा पाठलाग करताना पाहुण्या संघाच्या 53 धावांवर 2 विकेट पडल्या. या दोन्ही विकेटमध्ये जो रुटचं योगदान राहिलं. त्यानंच हे दोन्ही झेल घेतले.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या डावापूर्वी जो रुटच्या नावे कसोटीमध्ये 198 झेल होते. त्यानं 199वा झेल मदुष्काच्या रुपात घेतला. तर निसंका त्याचा 200वा झेल ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविड यांच्या नावे आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 210 झेल घेतले.
कसोटीमध्ये सर्वाधिक झेल (डाव)
राहुल द्रविड – 210 (301)
महेला जयवर्धने – 205 (270)
जो रुट – 200 (275)
जॅक कॅलिस – 200 (315)
रिकी पॉन्टिंग – 196 (328)
हेही वाचा –
“माझं लक्ष्य आता…” सचिनचं रेकाॅर्ड मोडीत काढण्यावर रूटचं खळबळजनक वक्तव्य
आश्चर्यकारक! 16 वर्षाच्या संपूर्ण कारकीर्दीत कधीच RUN-OUT झाला नाही ‘हा’ भारतीय
दमदार कामगिरीसह रूटच्या निशान्यावर सचिनचा ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’