सेंट ल्युसिया | विंडीज विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यातील इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने शानदार शतकी खेळी केली आहे. त्याच्या याच नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ११० षटकांत ४ बाद ३२५ धावा केल्या आहेत.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रुट १११ तर बेन स्टोक्स २९ धावांवर खेळत होते. या खेळीत जर रुटने नाबाद १३७ पेक्षा जास्त धावांची खेळी केली किंवा १८७ धावांच्या पुढे बाद झाला तर त्याची कसोटीतील सरासरी पुन्हा ५०च्या वर जाणार आहे.
या शतकी खेळीत रुटने आज एक खास विक्रम केला आहे. या दशकातील फॅब ४ म्हणून ओळखले जाणारे जो रुट, विराट कोहली, स्टिव स्मिथ आणि केन विलियम्समध्ये रुट आता सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
रुटने आज विराट कोहलीला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ८० सामन्यांत १४७ डावांत फलंदाजी करताना ४९.८०च्या सरासरीने ६६७४ धावा केल्या आहेत. तर विराटच्या नावावर ७७ सामन्यांत १३१ डावांत ६६१३ धावा आहेत.
मार्च २०१८पासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना न खेळल्यामुळे या यादीत स्टिव स्मिथ तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे.
फॅब ४मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
६६७४- जो रुट, सामने- ८०
६६१३- विराट कोहली, सामने-७७
६१९९- स्टीव स्मिथ, सामने- ६४
५८६५- केन विलियम्सन, सामने- ७०
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने
–असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ
–हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?
–भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके
–आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच
–…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा