---Advertisement---

कॅम्पमध्ये ‘बिन बुलाए मेहमान’ आल्यानंतर जो रुटने केला पाहुणचार, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: गुरूवार, डिसेंबर 1, 2022 6:33 PM
joe root
---Advertisement---

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारी (1 डिसेंबर) रावलपिंडी याठिकाणी सुरू झाली. इंग्लंडचा कोसटी संघ तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आल्यामुळे या मालिकेचे महत्व अधिकच वाढले आहे. सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाने रावलपिंडीमध्ये सराव केला. सराव सत्रातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट याच्या मनात प्रण्यांविषयी असलेले प्रेम दिसून आले.

रावलपिंडी कसोटी सामन्यात इंग्लंड संघ सध्या चांगली फलंदाजी करताना दिसला आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाने मैदानात कसून सराव केला. संघातील खेळाडू सराव करत असताना त्याठिकाणी एक मांजर मैदानात आली. खेळाडूंनी मात्र या मांजराला तिथून पळवून लावण्याऐवजी तिच्या पाठीवरून हात फिरवताना दिसले. जो रुट (Joe Root) या मांजराना पाहून त्याला खाण्यासाठी काहीतरी देताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे मांजर देखील रुटने दिलेल्या जेवणाचा आनंद घेतना दिसले.

दरम्यान, जो रुट इंग्लंड संघाचा मोठा काळ कर्णधार म्हणून खेळला आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडच्या कसोटी संघाने काही महत्वाच्या मालिकाही जिंकल्या. परंतु संघाचे प्रदर्शन मागच्या काही वर्षात खालवल्याचे दिसले. याच पार्श्वभूमीवर एप्रिल 2022 मध्ये त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. रुटनंतर इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद बेन स्टोक्सच्या खांत्यावर सोपवले गेले. रुटने कसोटी संघासाठी एकूण 125 सामने खेळले आहेत आणि यामध्ये 229 डावांमध्ये 50.02 च्या सरासरीने 10505 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये रुटने एकूण 28 षटके आणि 54 अर्धशतके देखील कुटली आहेत.

कसोटी क्रिकेटच्या तुलनेत रुटने मर्यादित षटकांमध्ये इंग्लंड संघासाठी दिलेले योगदान कमीच दिसते. त्याने खेळलेल्या 158 वनडे सामन्यांमध्ये 50.06 च्या सरासरीने 6207 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये तो इंग्लंडसाठी 32 सामने खेळला आहे आणि यामध्ये 35.72 च्या सरासरीने 893 धावा केल्या आहेत. रुटच्या एकंदरीत कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने 315 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17605 धावा केल्या आहेत. यामध्ये 44 शतक आणि 95 अर्धशतकांचा समावेश आहे. (Joe Root fed the cat that came to the England team camp)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अँडरसनसोबतच्या ‘त्या’ कृत्यामुळे संघातून बाहेर होता ‘हा’ विस्फोटक खेळाडू, आता शतक ठोकत केले पुनरागमन
अरे, त्या दोघांना वनडेमध्येच सातत्याने खेळवा! भारताच्या दिग्गजाचे श्रेयस अय्यर-वॉशिंग्टन सुंदरबाबत वक्तव्य 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---