---Advertisement---

भारताविरुद्ध सामना म्हटलं की रुटची जबरदस्त कामगिरी ठरलेलीच! आकडे पाहून बसेल विश्वास

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 2:10 AM
---Advertisement---

भारत सध्या इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. नॉटिंघमवरील इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. त्यानंतर गुरुवार (१२ ऑगस्ट) पासून लॉर्ड्सच्या मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दीडशतकी खेळी केली आहे.

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत, तेथील वातावरण पाहता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. याच्या उत्तरादाखल इंग्लंडचा संघ मैदानात उतरला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पण नंतर कर्णधार जो रुटने अन्य फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करुन दिलेच पण आघाडीही मिळवून दिली. इंग्लंडने पहिल्या डावात ३९१ धावा केल्या आणि २७ धावांची आघाडी घेतली.

रुटने ३२१ चेंडूत नाबाद १८० धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने १८ चौकार मारले. या शतकासह त्याने एक खास विक्रम केला आहे. रुटचे हे कसोटी कारकिर्दीतील २२ वे तर एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३८ वे शतक होते. विशेष म्हणजे या ३८ शतकांपैकी १० शतकं रुटने भारताविरुद्धच ठोकले आहेत.

त्यामुळे त्याने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक शतकं भारताविरुद्ध करण्याचा कारनामा केला आहे. यानंतर सर्वाधिक शतके त्याने वेस्टइंडीज संघाविरुद्ध ठोकले आहेत. ज्यात एकूण ७ शतकांचा समावेश आहे. यानंतर श्रीलंका विरुद्ध ६, न्यूझीलंडविरुद्ध५, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३, पाकिस्तानविरुद्ध २, बांगलादेशविरुद्ध १ अशाप्रकारे त्यांनी आतापर्यंत एकूण ३८ शतके ठोकली आहे.

तसेच, त्याने भारताविरुद्ध ३००० धावाही पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध ३००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो इंग्लंडचा दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी केवळ ऍलिस्टर कूकने असा कारनामा केला आहे. कूकने भारताविरुद्ध ३२५३ धावा केल्या आहेत. रुटने भारताविरुद्ध ४७ सामन्यांत १० शतके आणि १५ अर्धशतकांसह ३०३१ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –
वाह रे पठ्ठ्या! जोस बटलरची विकेट घेताच ईशांत शर्माचा कुंबळ, कपिल देव यांच्या पंक्तीत समावेश
‘स्वत:च्या खेळाकडे आधी लक्ष दे’, विराटबद्दल ‘ते’ ट्वीट करताच रियान परागला चाहत्यांनी सुनावले
Video: बीसीसीआयचा लोगो दाखवत लाॅर्ड्स मैदानावर अज्ञात चाहत्याचा गोंधळ, खेळाडूंचे विनापैशाचे मनोरंजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---