---Advertisement---

इंग्लंडकडून ७४५ खेळाडू खेळले पण ‘असा’ विक्रम करणारा जो रुट दुसराच क्रिकेटपटू

On: रविवार, जानेवारी 24, 2021 3:31 PM
---Advertisement---

गॉल। इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. हा दौरा इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटसाठी भलताच यशस्वी ठरत आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. आता त्यानंतर त्याने सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.

जो रुटने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात १३९ चेंडूत शतक केले आहे. हे त्याचे १९ वे शतक आहे. याबरोबरच रुटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इंग्लंडकडून खेळताना १५ हजार धावा करण्याचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे हा टप्पा पार करणारा तो इंग्लंडचा केवळ दुसराच क्रिकेटपटू आहे.

इंग्लंडकडून आत्तापर्यंत ७४५ क्रिकेटपटूंनी किमान १ तरी सामना खेळला आहे. पण असा विक्रम रुटपूर्वी फक्त ऍलिस्टर कूकने केला आहे. रुटने २८० सामन्यांतील ३५० व्या डावात खेळताना १५ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्याआधी कूकने २५७ सामन्यांतील ३८७ डावात १५७३७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३८ शतकांचा आणि ७६ अर्धशतकांचा समावेश आहे.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा ५ वा क्रिकेटपटू – 

रुटने इंग्लंडकडून कसोटी खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये केविन पीटरसनला मागे टाकले आहे. त्यामुळे रुट आता इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये ५ व्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर कूक असून त्याने १२४७२ धावा केल्या आहेत. तर पीटरसनने ८१८१ धावा केल्या असून आता त्याला रुटने शतकी खेळी दरम्यान मागे टाकले आहे.

इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
१२४७२ – ऍलिस्टर कूक
८९०० – ग्रॅहम गुच
८४६३ – ऍलेक स्टिवर्ट
८२३१ – डेविड गॉवर
८१८२ – जो रुट*
८१८१ – केविन पीटरसन

श्रीलंकेने पहिल्या डावात ३८१ धावा उभारल्या –

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूजच्या(११०) शतकी खेळीच्या आणि दिनेश चंडिमल(५२), निरोशान डिकवेल्ला(९२) आणि दिलरुवान परेरा(६२) यांच्या अर्धशतकांमुळे ३८१ धावांचा डोंगर उभारला. या डावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडकडून पहिल्या डावात रुटच्या शतकाव्यतिरिक्त जोस बटलरने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. ८७ षटकात इंग्लंडने ६ बाद २६६ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

चाहत्यांसाठी गुडन्यूज! भारतातील ‘या’ टी२० मालिकेसाठी मिळू शकते स्टेडियममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री

गॅले कसोटीत जो रूटचा दे घुमाके! अवघ्या १३९ चेंडूत शतक करत नोंदवला मोठा विक्रम

मुलगा झाला तर त्याचं नाव रोशन ठेव, आजींचा एमएस धोनीला सल्ला; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---