भारतीय क्रिकेट संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन भारतात परतला आहे. त्यानंतर आता भारतीय संघाला मायदेशात इंग्लंडविरुद्ध दोन हात करायचे आहेत. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. दरम्यान, असे वृत्त समोर येत आहे की टी२० मालिकदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळू शकतो.
खरंतर सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक क्रीडा सामन्यांमध्ये प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जात नाही. ५ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या २ कसोटीदरम्यान देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र आता असे समोर येत आहे, की कसोटी मालिकेनंतर अहमदाबादच्या नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना येण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
टी२० मालिका १२ मार्चपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील सर्व ५ सामने अहमदाबादलाच खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितले की, अंतिम निर्णय सरकारलाच घ्यायचा आहे. पण आम्हाला स्टेडियममधील रिकाम्या जागा भरण्याची इच्छा आहे. आमचे प्रयत्न असतील की कमीत कमी ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती या सामन्यांसाठी असेल.
सध्या हा इंग्लंडचा दौरा कोरोनाच्या संकटामुळे तीन ठिकाणीच होणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेचे पहिले २ सामने चेन्नईत खेळले जाणार आहेत. त्यानंतर शेवटचे २ कसोटी सामने अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. यानंतर अहमदाबाद येथेच ५ टी२० सामने होतील. त्यानंतर पुण्यात ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
विशेष म्हणजे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून भारत-इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा या स्टेडियमवरील पहिला आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे.
इंग्लंडचा भारत दौरा-
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना- ५-९ फेब्रुवारी २०२१ (चेन्नई) वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा कसोटी सामना- १३-१७ फेब्रुवारी २०२१ (चेन्नई) वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा कसोटी सामना- २४-२८ फेब्रुवारी २०२१ (अहमदाबाद) वेळ – दुपारी २.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
चौथा कसोटी सामना- ४-८ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
टी२० मालिका –
पहिला टी२० सामना- १२ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा टी२० सामना- १४ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा टी२० सामना- १६ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
चौथा टी२० सामना- १८ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
पाचवा टी२० सामना- २० मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
वनडे मालिका –
पहिला वनडे सामना- २३ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – दुपारी २.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा वनडे सामना- २६ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – दुपारी २.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा वनडे सामना- २८ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
महत्त्वाच्या बातम्या –
मुलगा झाला तर त्याचं नाव रोशन ठेव, आजींचा एमएस धोनीला सल्ला; पाहा व्हिडिओ
वॉशिंग्टन सुंदरने वडिलांकडे सोपवली ‘टेस्ट कॅप’, सोशल मीडियावर होतंय कौतुक
‘आरसीबी’तून आऊट ‘सीएसके’त इन? उमेश यादवच्या त्या कृतीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान