---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा थरार अनुभवा ‘या’ दिग्गजांच्या वाणीतून, बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनेलची केली घोषणा

On: रविवार, जानेवारी 24, 2021 3:31 PM
---Advertisement---

भारताचा बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची तयारी सुरु झाली आहे. भारतात होणर्या या मालिकेत चार कसोटी सामने, पाच टी-२० आणि तीन वनडे सामने खेळवले जातील. या सामन्यांसाठीच्या अधिकृत समालोचकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.

या यादीत अनेक माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आल्याचे दिसून येत आहे. स्टार स्पोर्ट्सने देखील आपल्या हिंदी आणि इंग्लिश भाषेत समालोचन करणाऱ्या समालोचकांची यादी जाहीर केली आहे.

माजी खेळाडूंचा समावेश

इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्रजी भाषेत हर्षा भोगले, निक नाइट, मार्च बाऊचर, सुनील गावस्कर, दीप दास गुप्ता, मुरली कार्तिक आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन हे दिग्गज समालोचन करतील. तर हिंदी भाषेत समालोचन करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आकाश चोप्रा, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, आशीष नेहरा आणि इरफान पठाण या माजी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यात इंग्रजी भाषेतील समालोचन यादीत समावेश असलेले सुनील गावस्कर आणि दीप दास गुप्ता हिंदीतही समालोचन करतील.

इंग्लंडचा हा भारत दौरा दीर्घकाळ चालणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर पाच टी-२० आणि तीन वनडे सामने देखील खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत या समालोचकांच्या यादीत इतरही नावांचा नंतर समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

या यादीत समावेश झालेल्या सगळ्या समालोचकांना बीसीसीआयची मान्यता आहे. त्यामुळेच या यादीत संजय मांजेरकर यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. कारण स्टार स्पोर्ट्स हे बीसीसीआयचे अधिकृत प्रक्षेपणकरता असल्याने त्यांना बीसीसीआयचे नियम पाळणे बंधनकारक आहे. आणि बीसीसीआयने संजय मांजरेकर यांच्यावर गेल्या वर्षभरापासून समालोचन करण्यावर बंदी घातली आहे.

महत्वाच्या बातम्या:

चाहत्यांसाठी गुडन्यूज! भारतातील या टी२० मालिकेसाठी मिळू शकते स्टेडियममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री

गॅले कसोटीत जो रूटचा दे घुमाके! अवघ्या १३९ चेंडूत शतक करत नोंदवला मोठा विक्रम

मुलगा झाला तर त्याचं नाव रोशन ठेव, आजींचा एमएस धोनीला सल्ला; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---