इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शनिवारी, १४ ऑगस्ट) इंग्लंड संघाने ३९१ धावा करत २७ धावांची आघाडी मिळवून सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. इंग्लंडसाठी कर्णधार जो रूटने शानदार फलंदाजी करत वैयक्तिक नाबाद शतक झळकावले . या खेळीदरम्यान रूटने भारताविरुद्ध सर्वाधिक धावा बनविणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली.
रूटची शानदार खेळी
मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावल्यानंतर रूटने दुसऱ्या सामन्यातही तोच फॉर्म कायम राखला. तिसऱ्या दिवशी जो रुट ३२१ चेंडूत १८० धावा करुन नाबाद राहिला. त्याच्या या खेळीत त्याने १८ चौकार मारले. या शतकी खेळी दरम्यान त्याने भारताविरुद्ध २१४२ कसोटी धावा पूर्ण केल्या. भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या इंग्लिश फलंदाजांमध्ये तो ऍलिस्टर कूकपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अशी राहिली आहे रूटची भारताविरुद्धची आकडेवारी
इंग्लंडचा कसोटी कर्णधार असलेल्या जो रूटने भारताविरुद्ध आत्तापर्यंत २२ कसोटी सामन्यात खेळताना ६१ पेक्षा जास्तच्या सरासरीने २१४२ धावा फटकावल्या आहेत. त्यामध्ये ७ शतके व १० अर्धशतकांचा समावेश असून, चालू वर्षी चेन्नई कसोटीत केलेली २१८ धावांची खेळी त्याची भारताविरुद्धची सर्वोत्कृष्ट खेळी आहे.
यादीमध्ये या दिग्गजांचा समावेश
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा काढणारा फलंदाज म्हणून ऍलिस्टर कूकचा पहिला क्रमांक लागतो. त्याने आपल्या कारकीर्दीत भारताविरुद्ध ३० कसोटी सामने खेळताना २४३१ धावा काढल्या आहेत. यामध्ये तिसऱ्या स्थानी १७२५ धावांसह ग्रॅहम गूच आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर केविन पीटरसन व डेव्हिड गावर असून, त्यांनी अनुक्रमे १५८१ व १३९१ धावा जमविल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणे आणि पुजारा यांना संघातून काढून टाकण्याच्या मागणीवर केएल राहुलने केले “असे” भाष्य
राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार, कारण ऐकून कराल कौतुक