क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शनिवारी, १४ ऑगस्ट) इंग्लंड संघाने संपूर्ण दिवसभर झुंजार फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दमदार नाबाद शतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला. या खेळीत दरम्यान त्याने बरेच नवे विक्रम आपल्या नावे केले.
रूटचे दमदार नाबाद शतक
इंग्लंडचा कर्णधार रूटने तिसऱ्या दिवशी आपला अप्रतिम खेळ दाखवला. त्याने प्रथम जॉनी बेअरस्टोसोबत शतकी भागीदारी केली. यादरम्यान त्याने आपले २२ वे व भारताविरुद्धचे सातवे कसोटी शतक पूर्ण केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रूट अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने १८० धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडला महत्त्वपूर्ण अशी २७ धावांची आघाडी मिळाली.
अशी कामगिरी करणारा सर्वात तरुण फलंदाज
रूटने आपल्या खेळीदरम्यान आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण केल्या. पदार्पणापासून सर्वात कमी दिवसात ९००० धावा बनविणारा तो पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला. रूटने ३१६७ दिवसात हा पल्ला पार केला. त्याच्याआधी हा विक्रम ऍलिस्टर कूकच्या नावे जमा होता. त्याने ३३८० दिवसात हा टप्पा पार केलेला. तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या राहुल द्रविड व रिकी पॉंटिंग यांनी अनुक्रमे ३६६१ व ४००३ दिवसात ही कामगिरी केलेली.
सचिनला टाकले मागे
सर्वात कमी वयात ९ हजार कसोटी धावा बनवणारा रुट दुसरा फलंदाज ठरला. त्याने ३० वर्षे २२७ दिवस इतके वय असताना हा टप्पा पार केला. त्याने हा पराक्रम करताना सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. तेंडुलकरने ३० वर्षे २५३ दिवस एवढे वय असताना ९००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर ऍलिस्टर कूक आहे. कूकने ३० वर्षे १५९ दिवस इतके वय असताना ९००० कसोटी धावांचा टप्पा पार केला होता.
एकाच खेळीत रूटचे अनेक विक्रम
जो रूटने या खेळी दरम्यान अनेक नवे विक्रम आपल्या नावावर केले. रूट इंग्लंडसाठी २२ शतके ठोकणारा पाचवा फलंदाज बनला. त्याने या खेळी दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पार केला. रूटने आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच तोंडावर शतके ठोकण्याची कामगिरी केली. एकाच कॅलेंडर वर्षात पाच शतके ठोकणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू बनला.
महत्त्वाच्या बातम्या –
नऊ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच रूटने केली ‘ही’ खास कामगिरी
लाजवाब रूट! भारताविरुद्ध शानदार दीडशतकी खेळीसह कूकपाठोपाठ ‘त्या’ यादीत मिळवला दुसरा क्रमांक
रहाणे आणि पुजारा यांना संघातून काढून टाकण्याच्या मागणीवर केएल राहुलने केले “असे” भाष्य