---Advertisement---

आरारा..खतरनाक!! रूटने मारलेला अप्रतिम शॉट पाहून सिराजसह प्रेक्षक देखील आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 11:51 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरी लढत लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड संघाचा डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला होता. या डावात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान चौफेर फटकेबाजी केली होती. तसेच त्याने एक आगळा वेगळा शॉट देखील खेळला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जो रूटने पहिल्या डावात फलंदाजी करत असताना भारतीय गोलंदाजांच्या चिंतेत वाढ केली होती. त्याने आक्रमक गोलंदाजी करत असलेल्या मोहम्मद सिराजच्या चेंडूवर अप्रतिम शॉट खेळला होता. तर झाले असे की जो रूट १७० धावांवर फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजने गूड लेंथ चेंडू टाकला होता. ज्यावर त्याने शॉट मारण्यासाठी जागा बनवली आणि स्लीपच्या वरून चौकार मारला. रूटने हा शॉट मारल्यानंतर मोहम्मद सिराज आणि सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले होते.

रूटने सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) मैदानावर टीचून फलंदाजी केली होती. रूटने जॉनी बेअरस्टो सोबत मिळून चौथ्या गडीसाठी १२१ धावांची भागीदारी केली होती. तसेच जॉनी बेअरस्टो बाद होऊन माघारी परतल्यानंतर रूटने जोस बटलर आणि मोइन अली सोबत मिळून अर्धशतकी भागीदारी केली होती. मोइन अली बाद झाल्यानंतर रूटने एकहाती झुंज देत इंग्लंड संघाला ३९१ धावांपर्यंत पोहचवले होते.(Joe root sweep shot video went viral on social media)

मोठ्या विक्रमाला घातली गवसणी 
जो रुटने भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १४ धावांचा पल्ला गाठताच इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. तो ग्रॅहम गुचला मागे टाकत इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. गुच यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ८९०० धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ॲलिस्टर कूकच्या नावे आहे. कुकच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२४७२ धावा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांना ‘या’ कारणामुळे करण्यात आले ट्रोल

‘किंग’ कोहलीने स्लीपमध्ये टिपला ‘अविश्वसनीय’ झेल, मोईन अलीलाही बसला नव्हता विश्वास, पाहा व्हिडिओ

सचिन ते युवराज, भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी ‘अशा’ दिल्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---