---Advertisement---

जबरदस्त! जो रुटने डाईव्ह मारत अजिंक्य रहाणेचा घेतला एकहाती भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 1:55 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात पाहुणा इंग्लंड संघ फलंदाजीसह गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. इंग्लंडच्या ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ३० षटकात ४ बाद ८० धावा केल्या आहेत. यादरम्यान इंग्लंडचा संघनायक जो रुट याने अजिंक्य रहाणेचा भन्नाट झेल घेतला.

झाले असे की, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची सलामी जोडी पव्हेलियनला परतल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली संघाचा डाव पुढे नेत होता. परंतु ४८ चेंडूत ११ धावा केल्यानंतर डॉम बेसने विराटची विकेट काढली. त्यामुळे उपकर्णधार रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. परंतु इंग्लंडच्या खेळाडूंनी त्याला साधी दोन षटकेही नीट खेळू दिली नाहीत.

डावातील २७ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या बेसच्या तिसऱ्या चेंडूवर रहाणेने डाव्या बाजूला फुल शॉट मारला. परंतु त्या बाजूला रुट आधीपासूनच सावध होता. त्याने चेंडू आपल्या दिशेला येताच डाव्या बाजूला एकअंगी झेप घेतली आणि एका हाताने जबरदस्त झेल पकडला. यामुळे ६ चेंडूत १ धाव करत रहाणे बाद झाला.

रुटच्या या शानदार झेलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी त्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

https://twitter.com/MSDhoniRules/status/1358321082319601668?s=20

रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव ४ बाद ७३ धावांवर आला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आहे. कसोटीपटू चेतेश्वर पुजारासोबत मिळून तो संघाच्या डावास चालना देत आहे. भारताने दुसऱ्या सत्रापर्यंत ४ बाद १०८ धावा केल्या आहेत. इंग्लंडचे पहिल्या डावातील आव्हान पूर्ण करण्यासाठी त्यांना अजून ४७० धावा कराव्या लागणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvENG Test Live : भारताला जबरदस्त धक्का; कर्णधार कोहली पाठोपाठ अजिंक्य रहाणेही बाद, भारताच्या ४ बाद ७३ धावा

“रुट ज्या प्रकारे फिरकी गोलंदाजी खेळतो, तसे इंग्लंडच्या अर्ध्या संघालाही जमणार नाही”

भारतात नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा अश्विन दुसरा, पाहा पहिलं नाव कुणाचं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---