भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना हा इंग्लडचा कर्णधार जो रूट याच्यासाठी महत्त्वाचा सामना ठरणार आहे. कारण हा सामना त्याचा नेतृत्वातील शंभरावा सामना असेल. सध्या भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेवर त्याने आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत आपल्याला दुर्लक्षित केल्यानंतर या स्वरुपात खेळण्याची महत्वकांक्षा त्याने अद्यापही सोडलेली नाही. भारतात यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुहेरी शतक झळकावणाऱ्या रूटला टी-२० संघात पुनरागमन करायचं आहे. एका खासगी वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने संगितले की, “माझ्यासाठी सर्वात महत्वाची बाब ही आहे की, येत्या टी-१० विश्वचषकात मला माझ्या बळकट संघासोबत जायचे आहे. सोबतच चषक जिंकण्याची उत्तम संधी निर्माण करायची आहे. मला आशा आहे की, मी विश्वचषक विजेत्या संघात खेळू शकेल”.
“गेल्या काही वर्षात मला टी-२० सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. परंतु मला माहित आहे की, जे खेळाडू सध्या इंग्लंडच्या टी-२० संघाकडून खेळत आहेत, ते सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांच्या संधीसाठी पात्र आहेत. परंतु मला जर या स्वरुपात खेळण्याची पुन्हा संधी मिळाली; तर माझ्या परीने जितकी धावसंख्या उभारता येईल तितकी मी करण्याचा प्रयत्न करेन”, असे शेवटी बोलताना रूटने सांगितले.
जो रूटची टी२० कारकीर्द
३० वर्षीय रूटने आपल्या टी-२० कारकिर्दीत ८९३ धावा काढल्या आहेत. ज्यात त्याचा स्ट्राईक रेट १२६.३ इतका राहिला आहे. सोबतच पाच अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडकडून मे २०१९ मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळणाऱ्या रूट ने आतापर्यंत ३२ टी-२० सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत का इंग्लंड, चेन्नई कसोटीत कोणाचे पारडे जड? ‘अशी’ आहे आकडेवारी
IND Vs ENG : चेन्नई कसोटीत ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन