कार्डीफ। 2019 आयसीसी विश्वचषकात शनिवारी(8 जून) सोफिया गार्डन मैदानावर 12 वा सामना इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 106 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडकडून या सामन्यात जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी 3 विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
इंग्लंड 386 धावांचे रक्षण करत असताना आर्चरने बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज सौम्य सरकारला बाद इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. पण यावेळी एक अनोखी आणि सर्वांना चकीत करणारी घटना घडली.
झाले असे की बांगलादेशचा संघ 387 धावांचा पाठलाग करत असताना चौथ्या षटकात इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील दुसरा चेंडू 143 किलोमीटर प्रति तास वेगाने टाकला. यावेळी फलंदाजी करत असलेला सौम्य सरकार फटका मारायला चुकला.
त्यामुळे चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून जात ऑफ स्टंम्पच्या वरच्या भागाला लागल्याने बेल्स उडली. पण त्याचवेळी हा चेंडू ऑफ स्टम्पला लागुन वर उडाला आणि स्टम्पच्या मागे 54 मीटर दूर असलेल्या बाउंड्री लाईन पार करुन खाली पडला. ही घटना पाहुन आर्चरने टाकलेल्या चेंडूच्या वेगाची कल्पना येऊ शकते.
आर्चरने याच षटकातील पहिला चेंडू 153 किलोमीटर प्रति तास या वेगाने टाकला होता. या विश्वचषकातील आत्तापर्यंतचा सर्वात वेगाने टाकलेला हा चेंडू आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने 152 किलोमीटर प्रति तास वेगाने एक चेंडू टाकला होता.
Have you ever seen a ball go for 'six' after hitting the stumps? 👀#WeAreEngland #CWC19 pic.twitter.com/nL2SToZ8iC
— ICC (@ICC) June 8, 2019
या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 387 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 48.5 षटकात सर्वबाद 280 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने चांगली कामगिरी करताना 119 चेंडूत 121 धावांची शतकी खेळी केली. पण त्याला मुस्तफिजूर रहिम व्यतिरिक्त अन्य फलंदाजांची खास साथ मिळाली नाही.
मुस्तफिजूर रहिमने छोटेखानी 44 धावांची चांगली खेळी करत शाकिब बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी रचली होती. पण या दोघांची भागीदारी तुटल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या.
तत्पूर्वी इंग्लंडकडून जेसन रॉयने 121 चेंडूत 153 धावांची दिडशतकी खेळी केली. तसेच त्याने 51 धावांची अर्धशतकी खेळी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोबरोबर 128 धावांची सलामी भागीदारी रचली. त्याचबरोबर इंग्लंडकडून जॉस बटलरनेही 44 चेंडूत 64 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने 50 षटकात 6 बाद 386 धावांचा डोंगर उभा केला.
बांगलादेशकडून मेहदी हसन आणि मोहम्मद शैफुद्दीनने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान आणि मश्रफे मुर्तझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वॉर्नरने मारलेला चेंडू डोक्याला लागून भारतीय वंशाचा गोलंदाज झाला दुखापतग्रस्त
–विश्वचषक २०१९: जेसन रॉयने शतक तर केलेच पण अंपायरलाही पाडले खाली, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: कर्णधार कोहलीला आशिर्वाद देण्यासाठी असा आहे त्याच्या शाळेचा अनोखा उपक्रम