---Advertisement---

बापरे! विंडीजचा २३ वर्षीय खेळाडू २०१९विश्वचषक खेळणार इंग्लंडकडून!

On: मंगळवार, जून 19, 2018 9:04 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या नियमाप्रमाणे एखाद्या खेळाडूला जर आपली जन्मभूमी सोडून दुसऱ्या संघाकडून खेळायचे असेल तर, ज्या देशाकडून त्याला खेळायचे आहे त्या देशात त्याने सलग चार वर्ष निवास करणे गरजेचं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने हाच नियम शिथिल केला आहे. चार वर्षाऐवजी तीन वर्षे दुसऱ्या देशात निवास केल्यास त्या देशाकडून क्रिकेट खेळण्यासाठी तो खेळाडू पात्र होतो असा नवा नियम आहे.

जोफ्रा आर्चर 2015 पासून ससेक्स क्रिकेट क्लबकडून खेळतोय. 2019 विश्वचषकापूर्वी त्याच्या इंग्लंडमधील वास्तव्यास तीन वर्ष पूर्ण होतील.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या गेल्या काही दिवसांपासून आर्चरला इंग्लंड संघात समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू होत्या.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या नियमानुसार परदेशी क्रिकेटपटूला इंग्लडमध्ये सात वर्ष निवास केल्यानंतर इंग्लंड संघाकडू खेळण्यास तो क्रिकेटपटू पात्र होतो.

आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ त्याचा सात वर्षाचा नियम शिथिल करून आर्चरचा आपल्या संघात समावेश करू शकते.

बार्बाडोसमधे जन्मलेल्या जोफ्रा आर्चरने वेस्टइंडीजच्या अंडर-19 संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2017 मधे बिग बॅश लीगमधील त्याच्या प्रदर्शनाने त्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

याच कामगिरीमुळे आयपीएल 2018 साठी राजस्थान रॉयल्सने त्याला 7.20 कोटी रूपये मोजून त्याला करारबध्द केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

दादा संघाची गेल्या ३४ वर्षातील आयसीसी क्रमवारीतील सर्वात निचांकी घसरण तर टीम इंडिया…

फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment