सध्या जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला इंग्लंडचा जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर परतला आहे. आर्चरने काउंटी चॅम्पियनशिपच्या सामन्यातून पुनरागमन केले. आर्चरने या सामन्यात धारदार गोलंदाजी करताना आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले.
पहिल्या डावात केले इतके गडी बाद
आर्चरने दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताच दोन गडी बाद केले. दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर त्याचा पहिला स्पर्धात्मक सामना होता. गुरुवारी (१३ एप्रिल) केंट विरुद्ध काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात आर्चरने ससेक्ससाठी खेळताना १३ षटकांत २९ धावा देऊन दोन बळी मिळवलेले. त्याने झॅक क्राऊली आणि केंटचा कर्णधार बेल ड्रुमंड यांना बाद केले. आर्चरच्या योगदानामुळे ससेक्सने केंटला १४५ धावांवर रोखण्यात यश मिळवले.
मी पूर्णपणे तंदुरुस्त झालो
पुनरागमन केल्यानंतर प्रतिक्रिया देताना आर्चर म्हणाला, “मी सध्या तंदुरुस्त वाटत आहे. मला वाटते मी चांगली गोलंदाजी केली. गेल्या आठवड्यात ससेक्सच्या द्वितीय श्रेणीच्या संघाकडून खेळणे माझ्या फायद्याचे ठरले. ज्यामुळे मला आत्मविश्वास मिळवणे सोपे झाले. सध्या मी व्यवस्थित आहे.” आर्चरने यापूर्वी आपला अखेरचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेत खेळला होता.
जानेवारी महिन्यात घरामध्ये फिशटॅन्क साफ करताना आर्चरच्या उजव्या हातात काचेचा तुकडा अडकलेला होता. ज्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागलेली. या दुखापतीमुळे तो इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधून बाहेर पडला होता. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो. स्पर्धेदरम्यान अचानकपणे खेळाडू व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये एकाच षटकात या दोघांनी टाकलेत १० चेंडू, एक जण आहे टी२० दिग्गज
वेस्ट क्रिकेटचा पुढील चार महिन्यांचा कार्यक्रम जाहीर, या संघांशी करणार दोन हात
दुखापतींमुळे कारकिर्दीचे नुकसान झाले, या खेळाडूने व्यक्त केली खंत