---Advertisement---

विश्वचषक २०१९: इंग्लंड आणि पाकिस्तानच्या या खेळाडूंना झाला दंड, जाणून घ्या कारण

On: बुधवार, जून 5, 2019 4:53 PM
---Advertisement---

लंडन। सोमवारी(3 जून) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या आयसीसी विश्वचषक 2019 स्पर्धेतील सहावा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 14 धावांनी विजय मिळवला आहे.

पण असे असले तरी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने दंड झाला आहे. तसेच आयसीसीच्या आचारसंहितेतील नियमांचा भंग केल्या प्रकरणी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि जेसन रॉय यांना मॅच फिच्या 15 टक्के दंड करण्यात आला आहे.

रॉयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेतील कलम 2.3 चा भंग केल्यामुळे त्याला मॅच फिच्या 15 टक्के दंड करण्यात आला आहे आणि 1 डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. त्याने या सामन्यात पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करत असताना 14 व्या षटकात मिसफिल्डींग झाल्यानंतर अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्याला ही शिक्षा झाली आहे.

तसेच आर्चरने आचारसंहितेतील कलम 2.8 चे उल्लघंन केल्याने त्यालाही मॅच फिच्या 15 टक्के दंड करण्यात आला आहे आणि 1 डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. त्याने पाकिस्तानच्या डावातील 27 व्या षटकात पंचांच्या निर्णयावर असंतोष दर्शवला होता.

त्याचबरोबर पाकिस्तानचा कर्णधार अहमदला षटकांची गती कमी राखल्याने मॅच फिच्या 20 टक्के दंड आणि त्याच्या संघसहकाऱ्यांना मॅच फिच्या 10 टक्के दंड करण्यात आला आहे.

रॉय, आर्चर आणि अहमद या तिघांनीही अपराध मान्य केला असून सामनाधिकारी आणि सामना पंचांनी दिलेल्या या शिक्षा मान्य केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषकातून बाहेर पडलेल्या डेल स्टेनला विराट कोहलीने दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारताचा ११ जणांचा संघ

जेव्हा जेव्हा भारत विश्वचषकातील पहिला सामना जिंकतो…

विश्वचषक २०१९: …तर आजचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होऊ शकतो रद्द

ज्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण केले त्याचाच विक्रम आज धोनी मोडणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment