इंग्लंडने क्रिकेट इतिहासात पहिल्यांच २०१९मध्ये विश्वचषक (वनडे) आपल्या नावावर केला. या विश्वचषकात इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने विश्वचषकातील मेडलबद्दल मोठा खुलासा केला आहे.
आर्चरने (Jofra Archer) विचारण्यात आले होते की, त्याचे विश्वचषकातील मेडल (Medal) कुठे आहे? त्यावेळी त्याने याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की, “कोणीतरी त्याचा फोटो तयार करून मला पाठवला होता, तेव्हा मी माझं मौल्यवान मेडन त्या फोटोवर लटकवले होते. ज्यावेळी मी नवीन घरात शिफ्ट झालो, तेव्हा मी तो फोटो भितींवर लावला होता. परंतु त्यावर मला मेडल दिसले नाही. मी पूर्ण घरात ते मेडल शोधले. परंतु ते मला कुठेही मिळाले नाही.”
“माझे मेडल माझ्या घरामध्येच आहे. त्यामुळेच मी माझ्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवून आहे. मी मेडल शोधून शोधून खूप थकलो होतो. परंतु आता लॉकडाऊनमुळे मला वेळ मिळाला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा होत नाहीत. इतकेच नव्हे तर इंग्लंडमधीलही क्रिकेटस्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मला मेडल शोधण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे,” असेही आर्चर यावेळी म्हणाला.
आर्चरने २०१९च्या वनडे विश्वचषकात (ODI World Cup 2019) एकूण २० विकेट्स घेतल्या होत्या. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या सुपर ओव्हरमध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तरीही सुपर ओव्हर बरोबरीत सुटली होती. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडला बाऊंड्री काऊंट नियमाच्या आधारावर विजयी घोषित करण्यात आले होते
ट्रेंडिंग घडामोडी-
-लाॅर्ड्सवर गांगुलीने या खेळाडूला दिला होता टी-शर्ट काढण्याचा सल्ला
-समुद्रात जहाज फुटल्याने सोबर्स यांच्या वडिलांचे अपघातात झाले होते निधन
-जगातील सर्वात जास्त चर्चा झालेली सर्वात वेगवान क्रिकेट लीग होण्याची शक्यता