भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी कहर केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेली टीम इंडिया केवळ 46 धावांवर ऑलआऊट झाली. भारताची मायदेशातील कसोटी सामन्यातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. याशिवाय विल्यम ओरुकला 4 बळी मिळाले. तर टीम साऊदीनं 1 विकेट घेतली.
भारताचा डाव गडगडल्यानंतर आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचं जवळपास 10 वर्ष जुनं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जोफ्रा आर्चरनं सुमारे 10 वर्षांपूर्वीच भारताच्या सर्वात कमी कसोटी धावांची भविष्यवाणी केली होती!
वास्तविक, आर्चरनं 21 नोव्हेंबर 2014 रोजी एक ट्विट केलं होतं. या वेगवान गोलंदाजानं आपल्या फक्त 46 असं लिहिलं होतं. आज तब्बल 10 वर्षांनंतर त्याच्या या ट्विटचा अर्थ लागला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ अवघ्या 46 धावांत गारद झाला. त्यानंतर जोफ्रा आर्चरचं हे जुनं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. सोशल मीडिया यूजर्स यावर सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही हे ट्विट येथे पाहू शकता.
46
— Jofra Archer (@JofraArcher) November 21, 2014
भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्याच्यावरच उलटला. भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला. संघाचे 5 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. रिषभ पंतनं सर्वाधिक 20 धावा केल्या.
भारतीय संघ 46 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडनं 3 गडी गामवून 180 धावा केल्या. सध्या त्यांच्याकडे 134 धावांची आघाडी आहे. सामन्याचे आणखी 3 दिवस बाकी आहेत.
हेही वाचा –
IPL 2025; लखनऊ केएल राहुलला रिलीज करणार? मोठे अपडेट समोर
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये जाणार? विदेशी मंत्रालयाचे मोठे वक्तव्य!
IND vs NZ; वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूकडे संघाची धुरा