---Advertisement---

जोफ्रा आर्चरचा मोठा पराक्रम! राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी

On: गुरूवार, एप्रिल 23, 2026 7:03 AM
---Advertisement---

आयपीएलच्या 19व्या हंगामातील 32वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात राजस्थानने शानदार खेळ करत 40 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने महत्त्वाची भूमिका बजावली.

आर्चरने आपल्या 4 षटकांत फक्त 20 धावा देत 3 विकेट घेतले आणि प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी खिळखिळी केली. या कामगिरीसोबतच त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.

आता जोफ्रा आर्चर हा राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसन याला मागे टाकले. वॉटसनने 84 सामन्यांत 67 बळी विकेट घेतले होते, तर आर्चरने केवळ 54 सामन्यांत 68 विकेट घेत अव्वल स्थान मिळवले. त्याचा गोलंदाजी सरासरी 23.69 असून इकॉनॉमी 7.74 आहे.

राजस्थानकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर्चर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर शेन वॉटसन (67), युजवेंद्र चहल (66), सिद्धार्थ त्रिवेदी (65) आणि शेन वॉर्न (58) यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान, आयपीएल 2026 हंगामातही आर्चर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 7 सामन्यांत 11 विकेट घेतले आहेत. त्याची सरासरी 18.09 आणि इकॉनॉमी 7.96 आहे. सुरुवातीच्या षटकांत बळी घेण्याची त्याची क्षमता राजस्थानसाठी मोठा फायदा ठरत आहे.

आगामी सामन्यांतही आर्चरकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---