---Advertisement---

जोफ्रा आर्चर क्रिकेटमध्ये नक्की कधी करणार पुनरागमन? स्वत: वेगवान गोलंदाजानेच दिले उत्तर

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 11:57 PM
---Advertisement---

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. तो सातत्याने दुखापतीचा सामना करत आहे. त्याने यादरम्यान गेल्या ३-४ महिन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या दुखापतींनी प्रत्येकवेळी डोकं वर काढल्याने त्याला पुन्हा मैदानाबाहेर जावे लागले. तो सध्या सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही.

असे असले तरीस त्याने कबूल केले आहे की, वारंवार त्याच्या  कोपऱ्याच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडणे निराशाजनक आहे. मात्र, कसोटी क्रिकेटपटू म्हणून त्याच्या भविष्याबद्दल तो सकारात्मक आहे. कारण तो आता २६ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत त्याला कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याची पूर्ण संधी आहे.

कोपऱ्याच्या शस्त्रक्रियेमुळे आर्चर २०२१ मधील क्रिकेट हंगामातून दूर झाला आहे. भारताविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त, आर्चर ॲशेस आणि आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ मध्ये देखील खेळू शकणार नाही. मात्र, पुढील वर्षी मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो परतण्याची शक्यता आहे.

आर्चरने डेली मेल कॉलममध्ये लिहिले की, ‘मी परत येण्याची घाई करणार नाही. मार्च महिन्यात इंग्लंडच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी मी वेळेत तयार होईल अशी आशा आहे. पण मी कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही. लवकरच मी याबाबत एका तज्ञाचा सल्ला घेईन. इंग्लंडला ३ कसोटी मालिकेसाठी २०२२ मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जायचे आहे.’

दुखापतीमुळे माझा दृष्टिकोन बदलला नाही- आर्चर
आर्चरने पुढे त्याच्या कॉलममध्ये लिहिले की, ‘जेव्हा मला माहिती मिळाली की, मी २०२१ मध्ये क्रिकेट खेळू शकणार नाही. माझ्या हाताचा कोपऱ्यामध्ये आणि आणखी एक स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याने, पहिल्या दृष्टीक्षेपात मला विश्वास ठेवणे कठीण होते. मात्र, माझा नेहमीच विश्वास होता की, प्रत्येक गोष्ट एका कारणास्तव घडते आणि दुखापतीमुळे माझा माझ्या कारकीर्दीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार नाही.’

“माझ्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी बराच वेळ आहे”
या २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने पुढे लिहिले की, ‘मी यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे की, कसोटी क्रिकेट हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे आणि त्याबद्दल माझे विचार अजिबात बदलले नाहीत. भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मालिकेला मुकणे निराशाजनक आहे. तसेच, ॲशेससाठी ऑस्ट्रेलियाला जाणे शक्य नसणे हे देखील दुःखदायक आहे. मात्र, तुर्तास माझ्यासाठी हेच महत्वाचे आहे. मी फक्त २६ वर्षांचा आहे आणि मला वाटते की, कसोटी क्रिकेटपटू म्हणून माझ्याकडे खूप वेळ आहे.’

बारबाडोसमध्ये जन्मलेल्या २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने सांगितले की, मे महिन्यात त्याचे दुसऱ्यांदा कोपऱ्याचे ऑपरेशन होते. कारण त्याला हा प्रश्न कायमचा सोडवायचा होता. जेणेकरून तो इंग्लंडसाठी सामने जिंकण्यात मदत करू शकेन.

आर्चर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्चमध्ये खेळला
यावर्षी मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर आर्चर शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. त्याने ५ टी -२० मालिकांमध्ये भाग घेतला. पण तो दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

वडील होते कांबळीचे मोठे फॅन, म्हणून मुलीला म्हणायचे विनोद; आज तिनेच टीम इंडियात मिळवून दाखवले स्थान

क्या बात है..! रांचीच्या या चिमुरड्यांचा धोनीच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न

नको तेच झालं! इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव कोसळला अन् ‘तो’ नकोसा विक्रम झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---