---Advertisement---

भारतासाठी खुशखबर; २.९९च्या इकोनॉमीने विकेट्स घेणारा ‘हा’ इंग्लिश गोलंदाज कसोटी मालिकेला मुकणार!

---Advertisement---

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाने इंग्लंड संघाला मागील कसोटी मालिकेत मायदेशात ३-१ ने धूळ चारली होती. आता इंग्लंड संघाकडे प्रत्त्युत्तर देण्याची चांगली संधी असणार आहे. परंतु ही मालिका सुरु होण्यापूर्वीच इंग्लंड संघातील प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे, ज्याचा फटका इंग्लंड संघाला बसू शकतो.

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या मालिकेपूर्वी इंग्लंड संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतून इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा बाहेर झाला आहे. तसेच तो भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मलिकेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये उपलब्ध नसणार आहे. तो शुक्रवारी (२१ मे) दुसऱ्यांदा आपल्या डाव्या हातावर शस्त्रक्रीया करणार आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्विट करत म्हटले की, “जोफ्राच्या उजव्या कोपरच्या दुखापती संदर्भात वैद्यकीय सल्लागाराद्वारे पुनरावलोकन केले गेले. आता उद्या त्याची शस्त्रक्रिया होईल.”

कसोटीत २.९९ च्या इकोनॉमीने विकेट्स घेणाऱ्या जोफ्रा आर्चरने ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. या स्पर्धेतील त्याचा ‘बनाना स्विंग’चा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. परंतु दुखापतीमुळे त्याला पुन्हा शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला गेला. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डने याबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिले नाहीये की, जोफ्रा आर्चर मैदानात केव्हा पुनरागमन करेल.

जानेवारी महिन्यात भारतीय दौऱ्यावर येण्यापूर्वी त्याच्या हातात काच घुसली होती. त्याचा त्याला त्रास जाणवत आहे. याच कारणामुळे भारतीय संघाविरुद्ध झालेल्या क्रिकेट मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेला देखील टाटा बाय बाय करावे लागले होते. आता तो शस्त्रक्रियेनंतर केव्हा पुनरागमन करेल, हे पाहावे लागेल?

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू बनलाय मच्छीमार, पकडलेत ३ मोठे मासे; बघा खास फोटो

दुर्दैव! ८७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या क्रिकेटरला दोन वेळचं अन्नही मिळेना, आश्विनने ट्विट करत केली मदतीची याचना

जेव्हा साराने जड्डूला पाठवले होते भरपूर मैसेज; सोशलच्या पिचवर क्रिकेटपटूंमध्ये झालेली रोचक संभाषणे, टाका नजर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---