दक्षिण आफ्रिकेचा आणि आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक मैदानावर खेळत नसला की आपला मासेमारीचा छंदा पूर्ण करताना दिसतो. त्याला मासेमारी करायला खूप आवडते आणि याबद्दल तो लोकांना सांगण्यात अजिबात संकोच करत नाही. क्विंटन डी कॉकच्या
इन्स्टाग्राम बायोवर लिहिले आहे की, ‘सर्वसाधारण क्रिकेटर … पण एक चांगला मच्छीमार!’ क्विंटन डी कॉकचे सोशल मीडिया अकाउंट इतर क्रिकेटर्सप्रमाणे ड्रेसिंग रूममधील मजेदार संभाषण किंवा फोटोने भरलेली नाही. सोशल मीडियावर डी कॉक शेअर करत असलेले बरेचसे फोटो हे त्याचा छंदाशी निगडित असतात.
नुकत्याच झिम्बियातील सेकोमा आयलँड लॉजजवळ झालेल्या फिशिंग ट्रिपमध्ये क्विंटन डी कॉकने तीन मोठे मासे पकडले आहेत. याबद्दलचे फोटो डी कॉकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
क्विंटन डी कॉकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या तीन मोठ्या माशांचे फोटो शेअर केले आहेत. फोटो काळजीपूर्वक पाहिले तर त्यात दिसून येईल की डी कॉक या कामगिरीबद्दल खूप खूष आहे. डी कॉकच्या या पोस्टला अनेकांची पसंती मिळत असून माजी सहकारी डेल स्टेन आणि जॉर्ज कोएट्जे यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CO7ly2LsoPz/?utm_medium=copy_link
https://www.instagram.com/p/CPBbQJXMwle/?utm_medium=copy_link
डेल स्टेनने क्विंटन डी कॉकशी मस्करी करत लिहिले, ‘आशा आहे की तुमच्याकडे एक प्राणीसंग्रहालय असेल.’ त्याचवेळी कोएट्जेने एका इमोजीद्वारे आपले उत्तर दिले आहे. डेल स्टेन आणि क्विंटन डी कॉक या दोघांनाही मासेमारीबद्दल बरीच आवड आहे. दोघेही त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर माशांचे फोटो शेयर करत असतात.
दरम्यान आगामी काळात दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात 2 कसोटी आणि 5 टी20 सामने खेळणार आहे.या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या समर्थकांना डी कॉककडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






