इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा मागील बऱ्याच काळापासून दुखापतीशी झगडत आहे. आर्चर आधी भारताविरुद्धच्या कसोटी व वनडे मालिकेतून बाहेर झाला व त्यानंतर तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी कडून देखील एकही सामना खेळू शकला नाही. आर्चरने नुकतेच काही दिवसांपूर्वी काउंटी चॅम्पियनशिपचा सामना खेळत मैदानात पुनरागमन केले होते. मात्र या सामन्यादरम्यान त्याला पुन्हा दुखापत झाली असल्याची बातमी समोर आली होती.
आर्चरच्या या दुखापतीबद्दल आता अधिक माहिती मिळत असून त्यानुसार आर्चर आगामी काळात भारताविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर होण्याची चिन्हे आहेत. यासोबतच आर्चर आयपीएलच्या उर्वरित हंगामात देखील खेळणार नसल्याचे समजते आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर आर्चर आगामी टी20 विश्वचषकावेळी संघात पुनरागमन करणार आहे.दरम्यान आर्चरने स्पष्ट केले आहे की पुनरागमन करण्याची तो घाई करणार नाही. आर्चरचे मुख्य लक्ष हे आगामी टी20 विश्वचषक स्पर्धा व वर्षाच्या शेवटी होणारी ॲशेस मालिका खेळणे आहे.
जोफ्रा आर्चर म्हणाला की, मी एका गोष्टी बाबत आश्वस्त आहे, ते म्हणजे मी कोपराच्या शस्त्रक्रीयेनंतर मैदानावर पुनरागमन करण्याची घाई करणार नाही. माझे पहिले प्राधान्य टी20 विश्वचषक आणि त्यानंतर इंग्लंडच्या वतीने अॅशेस मालिका खेळणे आहे. जोफ्रा आर्चर म्हणाला की, मला आता विश्वास आहे की मी तंदुरुस्त आहे. आणि पूर्वीप्रमाणेच प्रभावी देखील आहे, त्यामुळे यावर्षी मी दोन्ही महत्त्वपूर्ण मालिकांमध्ये खेळणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, जोफ्रा आर्चरची शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.
निश्चितच ,आर्चर सारखा प्रभावी गोलंदाज जर इंग्लंडच्या वतीने भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार नसेल तर तो एक मोठा धक्का आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की सतत होत असलेल्या दुखापतीमुळे आर्चर केव्हा मैदानात पुनरागमन करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानावर दुखापत झाल्याने ‘या’ तीन खेळाडूंना गमावावे लागले प्राण, एका भारतीयाचाही समावेश
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत गगनाला भिडली, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
आता रणजी खेळाडू देखील होणार करारबद्ध? आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी माजी फलंदाजाचा सल्ला






