राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग स्पेल फेकणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात चार षटकांमध्ये गोलंदाजी करताना 76 धावा दिल्या आहेत. या विक्रमामध्ये त्याने भारतीय गोलंदाज मोहित शर्माला मागे टाकले आहे. मोहितने आयपीएल 2024 हंगामात गुजरात टायटन्ससाठी खेळताना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात 73 धावा लूटवल्या होत्या.
हा सामना आर्चरसाठी खूप खराब ठरला. त्याने डावाच्या पाचव्या षटकात त्याच्या गोलंदाजीची सुरुवात केली. त्याच्या घातकी गोलंदाजीसाठी मशहूर असणारा जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात 23 धावा दिल्या, त्यामुळे प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला. त्यानंतर कर्णधार रियान परागने त्याला अकराव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आणले, ज्यामध्ये त्याने पुन्हा 12 धावा दिल्या. 2 षटकात त्याने 35 धावा लुटवल्या होत्या.
तसेच तिसऱ्या षटकात ईशान किशन तुफानी फलंदाजी करत होता.आर्चरने तिसऱ्या षटकात 22 धावा ठोकल्या. तिसऱ्या षटकातच त्याने गोलंदाजी मध्ये अर्धशतक केले. जोफ्रा आर्चर वेगवान गतीने गोलंदाजी करतो, त्याने त्याच्या शेवटच्या षटकांमध्ये सुद्धा 23 धावा दिल्या. या प्रकारे त्याने त्याच्या 4 षटकांमध्ये एकूण 76 धावा दिल्या.
जोफ्रा आर्चर एकाच स्पेलमध्ये सर्वात जास्त धावा लुटवणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर मोहित शर्माने 4 षटकात गोलंदाजी करताना 73 धावा लुटवल्या आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी बेसिल थंपी आहे,ज्याने 2018 मध्ये एकाच स्पेलमध्ये 70 धावा दिल्या होत्या. तसेच यश दयालने त्याच्या स्पेलमध्ये 69 तर रीस टॉप्लीने एकाच स्पेलमध्ये 68 धावा दिल्या होत्या.
आयपीएलमधील सर्वात महागडे षटक
जोफ्रा आर्चर – 76 धावा
मोहित शर्मा – 73 धावा
बेसिल थंपी – 70 धावा
यश दयाल – 69 धावा
रीस टॉप्ली – 68 धावा