इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिका बुधवारी (२७ जुलै) सुरू होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज असतानाच, यजमान इंग्लंडला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फलंदाज जॉनी बेअरस्टो हा कमीत कमी पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. संघाच्या जिम सेशनवेळी त्याने केलेली एक कृती त्याच्याच अंगलट आल्याचे सांगितले जातेय.
या कारणाने झाला असावा जायबंदी
इंग्लंडच्या या फलंदाजाच्या दुखापतीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, सहकारी खेळाडू रिस टोप्लीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवरून, त्याच्या दुखापतीचे किमान एक कारण स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुरवातीला बेअरस्टो जिम सेशनवेळी एखाद्या डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारप्रमाणे सहकारी अष्टपैलू सॅम कॅरनला खांद्यावर उचलताना दिसत आहे. परंतु, वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर बेअरस्टोला वेदना होऊ लागल्या.
Jonny Bairstow is built different 🏋🏻♂️
📹 via Reece Topley pic.twitter.com/85w2GutZpc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 26, 2022
याच कारणाने त्याला सराव सत्र अर्ध्यातून सोडावे लागले. तसेच त्याच्या उजव्या गुडघ्यावर पट्टी देखील लावल्याचे सांगितले जात आहे. सध्या तरी ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात येतेय. तरीही, बेअरस्टो या सामन्यासाठी उपलब्ध नसल्यास हॅरी ब्रुक्स अथवा फिल सॉल्ट या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. हे दोघेही भारताविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसले होते.
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे बेअरस्टो
जॉनी बेअरस्टो मागील काही काळापासून तुफान फॉर्ममध्ये आहे. खासकरून कसोटी क्रिकेटमध्ये त्याने मागील चारही सामन्यात शतके झळकावलीत. भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याने विश्रांती घेतली होती. तसेच त्यानंतरच्या भारत व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तो केवळ समाधानकारकरित्या खेळू शकलेला. उभय संघातील टी२० मालिकेत तीन सामने खेळले जातील. त्यानंतर कसोटी मालिका होईल. याचदरम्यान बरेचसे इंग्लिश खेळाडू द हंड्रेडच्या दुसऱ्या हंगामात खेळतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला
वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग