भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी20 मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. मालिकेतील सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. पहिला सामना डर्बनमध्ये आणि पुढील तीन सामने अनुक्रमे 10, 13 आणि 15 नोव्हेंबर रोजी गेकेबेर्हा, सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे खेळवले जातील. या मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व एडन मार्कराम करणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया-
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी20 शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. मालिकेतील पहिला टी20 सामना डर्बनच्या किंग्समीड मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरू होईल. तर दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात उतरतील. स्पोर्ट्स 18 च्या विविध चॅनेलवर भारतीय चाहते भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी20 थेट पाहू शकतात. चाहत्यांना जियो सिनेमा वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी20 सामना मोफत पाहता येईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 वेळापत्रक
8 नोव्हेंबर: पहिला टी20 , डर्बन (भारतीय वेळेनुसार रात्री 8:30)
10 नोव्हेंबर: दुसरा टी20 , गेकेबरहा येथे (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30)
13 नोव्हेंबर: तिसरी टी-20, सेंच्युरियन (भारतीय वेळेनुसार रात्री 8:30)
15 नोव्हेंबर: चौथा टी20 , जोहान्सबर्ग (भारतीय वेळेनुसार रात्री 8:30)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ-
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाख, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोन्गवाना, नकाबा पीटर, रायन सिमेलेटोन, लुईस रिकेलटन, आणि सिपमला (तीसरा आणि चौथा टी20), ट्रिस्टन स्टब्स.
हेही वाचा-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकण्यासाठी ‘या’ माजी खेळाडूने दिला भारतीय संघाला सल्ला
ICC Champions Trophy; ‘या’ दिवशी होणार वेळापत्रकाची घोषणा
IPL Mega Auction; मेगा लिलावात अनसोल्ड ठरू शकतो इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज?