---Advertisement---

तब्बल १९ हजार धावा करणारा क्रिकेटर झाला इंग्लंडचा फलंदाजी कोच, पाकिस्तान मालिकेत करणार महागुरुचे काम

On: मंगळवार, ऑगस्ट 4, 2020 2:02 PM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट याला पाकिस्तान विरुद्ध आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. इंग्लंडकडून 52 कसोटी सामने खेळणारा 39 वर्षीय फलंदाज न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू जीतन पटेल आणि वेगवान गोलंदाज ग्रॅमी वेल्च यांच्यासह काम करेल. या सर्वांचा पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुडच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला.

वेल्चला वेगवान गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर पटेल यांना केवळ दुसर्‍या व तिसर्‍या कसोटी सामन्यांसाठी फिरकी गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पहिला कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध 5 ऑगस्टपासून मॅनचेस्टर येथे होणार आहे. या मालिकेत इंग्लंड आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानी आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल. 13 आणि 21 ऑगस्ट रोजी साऊथॅंम्प्टन येथे इतर दोन कसोटी सामने होतील.

ट्रॉटने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याने प्रथम श्रेणीमध्ये  19 हजार धावा केल्या. 2011 मध्ये त्याला विस्डेन क्रिकेटर ऑफ दी इयर आणि आयसीसी प्लेअर ऑफ दी इयर यासाठी त्याची निवड झाली होती. तो इंग्लंडच्या प्रतिष्ठित संघाचा सदस्य होता जो जगातील नंबर एकचा कसोटी संघ बनला होता.

ताणतणाव आणि अस्वस्थतेचे कारण सांगत ट्रॉटने नोव्हेंबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाच‍ा अ‍ॅशेस दौरा सोडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचे ठरविले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केल्यानंतर  4 मे 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 44.08 च्या सरासरीने 3,835 धावा केल्या. त्याची 68 वनडे सामन्यातील सरासरी 51.25 होती.

इंग्लंडचा कसोटी संघ:

जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जक क्रॉली, सॅम करन, ओली पोप, डोम बाइबल, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड

महत्त्वाच्या बातम्या-

-माजी क्रिकेटर राहुल द्रविड पुन्हा आला टीम इंडियाच्या मदतीला, आता सांभाळणार ही जबाबदारी

-धोनीच्या कोरोना चाचणीबद्दल आले मोठे वृत्त, सीएकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती

-हा क्रिकेटर तर चुकून झाला राष्ट्रीय संघाचा कोच, नाहीतर मोहम्मद युसूफच होता लायक

ट्रेंडिंग लेख-

-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…

-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….

-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---