---Advertisement---

यंदाच्या वर्षी बेयरस्टो ठरलाय शतकांचा सम्राट, वाचा भारताविरुद्ध खेळताना रचलाय कोणता नवा विक्रम?

On: सोमवार, जुलै 4, 2022 11:23 AM
Jonny-Bairstow-1
---Advertisement---

बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. शनिवारी या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ऑलआऊट होईपर्यंत २८४ धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टोने संघाकडून चमकदार कामगिरी करताना शतक झळकावले. त्याने १४० चेंडूत १०६ धावा केल्या. बेअरस्टोने या खेळीत १४ चौकार आणि २ षटकार मारले. या शतकाच्या जोरावर बेअरस्टोने खास विक्रम केला. या वर्षी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा तो फलंदाज ठरला.

भारताविरुद्धच्या पहिल्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. ४४ धावांवर संघाने पहिले ३ विकेट गमावले. मात्र, यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेअरस्टोने डावाची धुरा सांभाळली. त्याने शतक झळकावले. बेअरस्टो हा असा फलंदाज आहे ज्याने २०२२ मध्ये आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. त्याने ५ शतके झळकावली आहेत. तर उस्मान ख्वाजा आणि जो रूट या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांनी ४-४ शतके झळकावली आहेत.

बेअरस्टोने आणखी एक कामगिरी केली आहे. ५व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करत तो इंग्लंडसाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बेअरस्टोने १० शतके झळकावली आहेत. तर इयान बेल या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने १६ शतके झळकावली आहेत. या बाबतीत इयान बोथम दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४ शतके झळकावली आहेत.

पाचव्या क्रमांकावर किंवा त्याखालील फलंदाजीसाठी कसोटीत इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके
१६ : इयान बेल
१४: इयान बोथम
११: ग्रॅहम थॉर्प / बेन स्टोक्स
१० : बेअरस्टो*
९: कॉलिंगवुड

2022 मधील सर्वाधिक कसोटी शतके
५: जॉनी बेअरस्टो*
४: उस्मान ख्वाजा / जो रूट
३: डॅरिल मिशेल

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘जस्सीला फावल्या वेळात मी फलंदाजीचे प्रशिक्षण दिले’, बुमराहच्या जवळच्या व्यक्तीने घेतले त्याच्या बॅटिंगचे श्रेय

सुनील गावसकरांनंतर ३६ वर्षांनी एकटा चेतेश्वर पुजारा करू शकला ‘ही’ कामगिरी, वाचा सविस्तर

दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात भारताने दुसरा सामनाही जिंकला, वाचा कोण ठरलं विजयाचा शिल्पकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---