भारतीय संघाचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघासठी अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. पण इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याला अर्धशतक ठोकण्यात यश आले. भारतीय संघाच्या पहिल्या डावात पुजारा अपयशी ठरला होता, पण दुसऱ्या डावात त्याने महत्वापूर्ण धावांचे योगदान दिले. दरम्यान, पुजारने स्वतःच्या नावापुढे एका मोठ्या विक्रमाची नोंद देखील केली आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना बर्मिंघमच्या एजबस्टनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसी भारतीय संघ ३ विकेट्सच्या नुकसानावर १२५ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत () हे दोघे अनुक्रमे ५० आणि ३० धावा करून खेळपट्टीवर कायम आहेत. पंतने पहिल्या डावात १४६ धावांचे झंजावाती शतक केले होते आणि दुसऱ्या डावात देखील तो चांगल्या लयीत दिसत आहे.
एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर गोलंदाजीसाठी नेहमीच अनुकूल परिस्थिती राहिली आहे. चेतेश्वर पुजारा ३६ वर्षातील भारताचा पहिला सलामीवीर फलंदाज ठराल आहे, ज्याने कसोटी अर्धशतक केले. यापूर्वी दिग्गज सुनील गावसकर () यांनी १९८६ साली अशी कामगिरी केली होती. त्यावेळी सावसकरांनी ५४ धावांची खेळी केली होती. एजबेस्टनमधील कसोटी सामन्यात आजपर्यंत भारताच्या एकही सलामीवीराला शतक करता आले नाहीये.
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाची वरची फली स्वस्तात बाद झाली. यामध्ये पुजारा १३ धावा करून बाद झाला होता. सलामीवीर शुबमन गिल पहिल्या डावात १७, तर दुसऱ्या डावात ४ धावा करून बाद झाला. पहिल्या चार विकेट्स अवघ्या ७१ धावांवर गामवल्यानंतर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाने संघाचा डाव सांभाळला. या दोघांच्या शतकी खेळीमुळे भारत पहिल्या डावात ४१६ धावा करू शकला. प्रत्युत्तरा इंग्लडचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळला गेला.
पुजाराने या सामन्यात अर्धशतक केले असले तरी, मागच्या दोन वर्षांपेक्षा मोठ्या काळापासून चाहते त्याच्या शतकाची प्रतिक्षा करत आहेत. पुजारने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे शतक केले होते. त्यानंतर मागच्या ५० इनिंग्जमध्ये त्याला शतक करता आले नाही. पुजाराने आतापर्यंथ खेळलेल्या ९५ कसोटी सामन्यांमध्ये ४४ च्या सरासरीने ६७१३ धावा केल्या आहेत. यामध्ये १८ शतक आणि ३२ अर्धशतकांचा समावेश होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पॉवेलच्या झंझावाती अर्धशतकाने बांग्लादेशचा दारुन पराभव, फक्त ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात भारताने दुसरा सामनाही जिंकला, वाचा कोण ठरलं विजयाचा शिल्पकार
आयपीएलचे चाहते लयंच वाढीव राव! भारताच्या कसोटी सामन्यातही करतायत मुंबई अन् आरसीबीची नामघोष