रोव्हमन पॉवेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी२०मध्ये सहज विजयाची नोंद केली. अशाप्रकारे बांगलादेशविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यात (WI vs BAN) वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज ब्रेंडन किंगनेही अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ६ बाद १५८ धावाच करू शकला. विंडीजने हा सामना ३५ धावांनी जिंकला. शाकिब अल हसन अर्धशतक झळकावून नाबाद परतला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्याने २६ धावांत २ गडी गमावले. काइल मेयर्स १७ तर शेमराह ब्रूक्स शून्यावर बाद झाला. यानंतर ब्रेंडन किंग आणि निकोलस पूरन यांनी दुस-या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करत संघाचा ताबा घेतला. पूरन ३० चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. किंगने ४३ चेंडूत ५७ धावा केल्या. ७ चौकार आणि १ षटकार मारला.
Job done #MenInMaroon take a 1-0 series lead
Excellent day for @Ravipowell26 @bking_53 @ObedCMcCoy @DavidDejonge2
Thank you the amazing fans at Windsor Park as cricket returned to ???????? for the 1st time in 5 years????
Join us on Thursday in ???????? for the 3rd and final T20I #WIvBAN pic.twitter.com/MTFJ2lfsZs
— Windies Cricket (@windiescricket) July 3, 2022
पॉवेलचे वादळ
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रोव्हमन पॉवेलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. त्याने किंगसोबत चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. त्याने २८ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. स्ट्राइक रेट २१८चा होता. २ चौकार आणि ६ षटकार मारले. म्हणजेच चौकारावरून ४४ धावा झाल्या. डावाच्या १६व्या षटकात त्याने डावखुरा फिरकी गोलंदाज शकिब अल हसनवर ३ षटकार आणि एक चौकार लगावला. ओडियन स्मिथही ४ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिला.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेश संघ हतबल झाला. त्याने २३ धावांत ३ गडी गमावले. अनामूल हक ३, लिटन दास ५ आणि कर्णधार महमुदुल्ला केवळ ११ धावाच करू शकले. यानंतर शाकिब आणि अफिफ हुसैन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला. अफिफने २७ चेंडूत ३४ धावा केल्या. मात्र वाढत्या धावगतीमुळे बांगलादेश संघाला धावसंख्या गाठता आली नाही. शाकिब ५३ चेंडूत ६८ धावा करून नाबाद राहिला. ५ चौकार आणि ३ षटकार मारले. वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅककॉय आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी २-२ बळी घेतले. पॉवेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात भारताने दुसरा सामनाही जिंकला, वाचा कोण ठरलं विजयाचा शिल्पकार
साहाचं ठरलंय! सध्याच्या संघाला जय महाराष्ट्र म्हणत ‘या’ संघाकडून भविष्यात क्रिकेट खेळणार
आयपीएलचे चाहते लयंच वाढीव राव! भारताच्या कसोटी सामन्यातही करतायत मुंबई अन् आरसीबीची नामघोष