इंग्लंड आणि पंजाब किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो आयपीएल 2023 मधून माघार घेत आहे. बेअरस्टो अद्याप पायच्या दुकापतीतून सावरला नसल्याने त्याला आगामी आयपीएल हंगामात खेळता येणार नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी आणि आगामी ऍशेस मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बेअरस्टो आगामी आयपीएल हंगामातून माघार घेत असल्याचे सांगितले जात आहे.
द गार्डिअनने दिलेल्या माहितीनुसार जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याला मागच्या वर्षी उन्हाळ्यात गोल्फ खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. गोल्फ कोर्सवर पाय घसरल्याने त्याच्या डाव्या वायाला दुखापत झाली होती, जी अद्याप बरी झाली नाहीये. बेअस्टोची फ्रँचायझी पंजाब किंग्जसाठी आयपीएल 2023च्या ऐन तोंडावर ही निराशाजनक बातमी आली. तत्पूर्वी दुखापतीमुळे 33 वर्षीय बेअरस्टोने टी-20 विश्वचषक 2022 मधून माघार घेतली होती. तसेच इंग्लंड संघाच्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड दौऱ्यातून देखील त्याला माघार घ्यावी लागली होती. दरम्यान, आगामी आयपीएल 31 मार्च रोजी सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गतविजेत्या गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळवला जात आहे.
31 मार्च रोजी सुरू होणारा आगामी आयपीएल हंगाम मे 2023 पर्यंत खेळला जाणार आहे. पण या संपूर्ण हंगामात बेअरस्टो पंजाब किंग्जसोबत जोडला जाण्याची शक्यात नाहीये. आगामी ऍशेस मालिका जून महिन्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी बेअरस्टो काउंटी क्रिकेटमधून पुनरागमन करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मागच्या आयपीएल हंगामात त्याने पंजाब किंग्जसाठी महत्वाचे योगदान दिले होते.
मागच्या हंगामात 11 डावांमध्ये त्याने संघासाठी 253 धावांचे योगदान दिले होते. यादरम्यान त्याची सरासरी 23 तर स्ट्राईक रेट 144.57 राहिला होता. त्याच्या एकंदरीत आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर एकूण 66 सामने त्याने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये बेअरस्टोच्या बॅटमधून 27.85च्या सरासरीने आणि 136.43च्या स्ट्राईक रेटने 1337 धावा निघाल्या.
(Jonny Bairstow will not be able to play in IPL 2023)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs AUS । मिचेल स्टार्कविरुद्ध खास रणनीतीसह उतरणार रोहित आणि कंपनी, वाचा सविस्तर
ना लाखो रुपये, ना कुठली गाडी! विलियम्सनला मालिकावीर पुरस्कारासाठी मिळालं भुवया उंचावणारं बक्षीस, पाहाच