इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर त्याचा संघ राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त प्रदर्शन करत आहे. राजस्थानने शनिवारी (७ मे) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बटलरने स्वतःच्या १२ धावा पूर्ण करतताच हंगामातील त्याच्या ६०० धावा पूर्ण केल्या. बटलर चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तर आहेच, पण पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने खास विक्रमाची नोंद केली.
आयपीएल २०२२मध्ये जोस बटलर (Jos Buttler) वैयक्तिक ६०० धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. तसचे तो राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या इतिहासात एका हंगामात वैयक्तिक ६०० धावा करणारा पहिला खेळाडू देखील ठरला आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा एकही खेळाडू एका हंगामात ६०० धावांचा टप्पा पार करू शखला नव्हता. पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात त्याने १६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारारच्या मदतीने ३० धावा ठोकल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
१० वर्षांनंतर मोडला अजिंक्य रहाणेचा विक्रम
यापूर्वी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) राजस्थान रॉयल्ससाठी एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने आयपीएल २०१२मध्ये १६ सामन्यांमध्ये ४०च्या सरासरीने आणि १२९.३०च्या स्ट्राईक रेटसह ५६० धावा केल्या होत्या. रहाणेने या हंगामात १ शतक आणि ३ अर्धशतके ठोकली होती. या हंगामात रहाणेने १०३ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली होती. रहाणेचा हा विक्रम मोडण्यासाठी तब्बल १० वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला आहे.
दरम्यान, बटलरने आयपीएलच्या चालू हंगामात खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ६१.८०च्या सरासरीने आणि १५२.२२च्या स्ट्राईक रेटने ६१८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३ शतकांचा आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. ११६ धावा हे त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन राहिले आहे. चालू हंगामात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याच्या बाबतीत देखील बटलर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने हंगामात ५५ चौकार आणि ३७ षटकार मारले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रबाडाला ‘बच्चा’ समजणे बटलरला पडले महागात, पहिल्या ५ चेंडूवर चोपल्यानंतर गोलंदाजाने ‘असा’ काढला काटा
‘माझ्यासोबत योग्य झालं नाही, मला वाईट वागणूक दिली’, आयपीएलबद्दलच्या भावनांना ख्रिस गेलकडून मोकळी वाट