इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी (२९ मे) या हंगामाचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. सायंकाळी आठ वाजता सुरू झालेला सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होत आहे.
राजस्थानने १४ वर्षानंतर प्रथमच आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यांनी २००८मध्ये शेन वॉर्नच्या (Shane Warne) नेतृत्वाखाली आयपीएलचे पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच, त्यांच्याकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे.
वॉर्नचे वयाच्या ५२व्या वर्षी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याचे राजस्थानच्या संघात प्रमुख स्थान असून त्याला रॉयल्सचा पहिला सभासद देखील म्हणता येईल. त्याने २००८मध्ये टी२० क्रिकेट प्रकाराचा अवलंब करत त्याला प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
वॉर्नविषयी सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी केलेला संवादाचा व्हिडिओ आयपीएलच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे.
Incredible ton 👌
Enjoying the captaincy 👍
Winning the title for the 'first Royal' Shane Warne 🙏Centurion @josbuttler chats with skipper @IamSanjuSamson as @rajasthanroyals march into the final. 👏 👏 – By @28anand
Full interview 🔽 #TATAIPL | #RRvRCBhttps://t.co/BxwglKxY8b pic.twitter.com/fDBa8si3pL
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
“हे वर्ष खूपच निराशाजनक ठरले आहे. राजस्थान संघाचा पहिला रॉयल्स सभासद वॉर्न हा या जगात नसल्याने मन उदास आहे, पण त्याचा वारसा आहे नाही का?”, असा प्रश्न जोसने सॅमसनला विचारला आहे.
“हा हंगाम सुरूवातीपासूनच वॉर्नला बहाल केला आहे. त्याच्यासाठी विजेतेपद जिंकण्यासाठी एकच पाऊल दूर असल्याने मी यावर अजून काही बोलू शकत नाही, पण आम्हाला वॉर्नसाठी आयपीएलचे विजेतेपद जिंकायचेच आहे हे नक्की,” असे उत्तर सॅमसनने दिले आहे.
Incredible ton 👌
Enjoying the captaincy 👍
Winning the title for the 'first Royal' Shane Warne 🙏Centurion @josbuttler chats with skipper @IamSanjuSamson as @rajasthanroyals march into the final. 👏 👏 – By @28anand
Full interview 🔽 #TATAIPL | #RRvRCBhttps://t.co/BxwglKxY8b pic.twitter.com/fDBa8si3pL
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
राजस्थानला अंतिम सामन्यात प्रवेश करून देण्यासाठी बटलरने महत्वाची भूमिका निभावली आहे. त्याने चार झंझावाती शतके करून १६ सामन्यांत ८२४ धावा करत ऑरेंज कॅपवर आपला हक्क दाखवला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असणारा केएल राहुलने ६१६ धावा केल्याने बटलरच ऑरेंज कॅपचा मानकरी आहे.
फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही राजस्थान संघाने प्रभावी ठरत आहे. त्यांचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने १६ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याला पर्पल कॅप परिधान करण्यासाठी एकच विकेट घेण्याची आवश्यकता आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी क्रिकेटरच्या फक्त राजस्थानला शुभेच्छा, दिला खास संदेश
“मी तुझे पैसे परत करेल”, जेव्हा राजस्थान संघ सोडण्यासाठी शेन वॉर्नने केलेली मनाची तयारी