---Advertisement---

किती ते दुर्दैव! इंग्लंडला वाचवण्यासाठी २०० पेक्षा जास्त चेंडू खेळूनही बटलर झाला ‘हिट विकेट’, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, डिसेंबर 21, 2021 2:22 PM
Jos-Buttler
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा(Ashes series) थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात २७५ धावांनी विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. हा सामना इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर(Jos Buttler) याच्यासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नसेल. कारण याच सामन्यात अशाच काही गोष्टी घडल्या ज्याचा कोणी विचारही केला नव्हता.

इंग्लंड संघ अडचणीत असताना, जोस बटलरने २०७ चेंडूंमध्ये २६ धावांची खेळी केली. तो खेळपट्टीवर असताना असे देखील वाटू लागले होते की, हा सामना अनिर्णीत राहील. परंतु, त्याच वेळी असे काही घडले, ज्यामुळे जोस बटलरचे आणि इंग्लंडच्या चाहत्यांचे हृदय तुटले. (Jos Buttler got out hit wicket)

तर झाले असे की, जोस बटलर २६ धावांवर फलंदाजी करत असताना झाय रिचर्डसन गोलंदाजीला आला होता. त्यावेळी जोस बटलरने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा मागचा पाय हलकेच यष्टीला जाऊन लागला. ज्यामुळे तो हिट विकेट झाला. जोस बटलरला शेवटपर्यंत माहीत नव्हते की, तो बाद झाला आहे. तो ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे आश्चर्याने पाहत होता. त्यावेळी त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा त्याला जाणवले की, तो बाद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

त्यानंतर त्याने निराश होऊन पॅव्हेलियनचा रस्ता धरला. इंग्लंड संघाला पराभूत होण्यापासून वाचवण्यासाठी जोस बटलरने शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु, अखेर नशिबाने त्याची साथ सोडली आणि तो बाद होऊन माघारी परतला. त्यापूर्वी यष्टिरक्षण करताना त्याने एक भन्नाट झेल टिपला होता. ज्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. परंतु, याच सामन्यात त्याने मार्नस लाबुशेनचे २ सोपे झेल सोडले.

महत्वाच्या बातम्या:

खेळपट्टीवर गवत पाहून भारतीय खेळाडू हैराण, द्रविडच्या ‘या’ सल्ल्याने वाढवले संघाचे मनोबल, पाहा व्हिडिओ

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---