आयपीएल २०२२ हंगामातील ३०वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स संघात पार पडला. सोमवारी (दि. १८ एप्रिल) ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानच्या जोस बटलरने फलंदाजीतून आग ओकली. त्याने या सामन्यात शानदार शतक झळकावत हंगामातील दुसरे शतक साजरे केले. विशेष म्हणजे, पंजाबविरुद्ध शतक करत बटलरने एक खास कामगिरीही केली.
या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्राथमिकरीत्या राजस्थानच्या फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. राजस्थानने पावरप्लेचा पुरेपूर फायदा उचलला आणि पहिल्या ६ षटकात ६० धावा जोडल्या. सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) ताबडतोब फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचली. पुढे बटलरने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. यावेली त्याने अवघ्या ६१ चेंडूत १०३ धावांची आतिषी खेळी केली. यामध्ये ५ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. बटलरच्या १०३ धावांमुळे राजस्थानने कोलकाताला २१८ धावांचे आव्हान दिले.
💯 for @josbuttler! 🙌 🙌
What a knock this has been from @rajasthanroyals right-hander! 👏 👏
His 2⃣nd hundred of the #TATAIPL 2022 & 3⃣rd IPL ton overall! 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR pic.twitter.com/xQyj6yejl1
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
बनवला हा खास विक्रम
बटलरचे हे या हंगामातील दुसरे शतक होते. विशेष म्हणजे, या शतकासह त्याने खास कामगिरी केली. तो राजस्थानकडून सर्वाधिक शतके मारणारा खेळाडू ठरला. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ३ शतके मारली आहेत. राजस्थानकडून सर्वाधिक शतके मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि शेन वॉटसन संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. रहाणे, सॅमसन आणि वॉटसन यांनी राजस्थानकडून खेळताना प्रत्येकी २ शतके मारली आहेत.
बटलरची आयपीएलमधील कामगिरी
बटलरच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ७१ सामन्यातील ७० डावात फलंदाजी करताना ३८.४१च्या सरासरीने २३४३ धावा चोपल्या आहेत. यामध्ये ३ शतकांचा आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये राजस्थानकडून सर्वाधिक शतके मारणारे खेळाडू
३ शतके- जोस बटलर
२ शतके- अजिंक्य रहाणे
२ शतके- संजू सॅमसन
२ शतके- शेन वॉटसन
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कोलकाताच्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध बटलरचा खणखणीत षटकार; १०० मीटर दूर जाऊन पडला चेंडू
आयपीएलप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! कोरोना पॉझिटिव्ह मिशेल मार्शचा आरटी- पीसीआर रिपोर्ट आला
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट