इंग्लंडला या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी20 आणि वनडे मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळले जातील. मात्र, त्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला नवा कर्णधार मिळाला आहे.
वास्तविक, इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीतून सावरू शकलेला नाही. त्यामुळे तो टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. याशिवाय एकदिवसीय मालिकेसाठीही त्याची उपलब्धता धोक्यात आहे. बटलर दुखापतीमुळे नुकत्याच झालेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेतही खेळू शकला नव्हता. आता त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे. बटलरच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी फिल सॉल्टकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली.
बटलरच्या अनुपस्थितीत फिल सॉल्टनं या हंगामात ‘द हंड्रेड’मध्ये मँचेस्टर ओरिजिनल्सचं कर्णधारपद सांभाळलं होतं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 सप्टेंबर रोजी साउथॅम्प्टन येथे मालिकेतील पहिला टी20 सामना खेळला जाईल. या मालिकेसाठी बटलरच्या जागी ‘सरे’चा अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आलाय.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ – फिल सॉल्ट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसले, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, रीस टॉपली, जॉन टर्नर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ – जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, रीस टॉपली, जॉन टर्नर
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला टी20 – 11 सप्टेंबर, सायंकाळी 6.30 वाजता
दुसरा टी20 – 13 सप्टेंबर, सायंकाळी 6.30 वाजता
तिसरा टी20 – 15 सप्टेंबर, दुपारी 2.30 वाजता
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला वनडे – 19 सप्टेंबर, दुपारी 12.30 वाजता
दुसरा वनडे – 21 सप्टेंबर, सकाळी 11.00 वाजता
तिसरा वनडे – 24 सप्टेंबर, दुपारी 12.30 वाजता
चौथा वनडे – 27 सप्टेंबर, दुपारी 12.30 वाजता
पाचवा वनडे – 29 सप्टेंबर, सकाळी 11.00 वाजता
हेही वाचा –
स्टार भारतीय क्रिकेटपटूची राजकारणात एंट्री, या पक्षाची सदस्यता स्वीकारली
टी20 विश्वात खळबळ; 320 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत या खेळाडूने रचला विश्वविक्रम
टीम इंडिया सावध राहा, बांगलादेश देऊ शकतो ‘जोर का झटका’!