---Advertisement---

जोस बटलर बनला आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘या’ खेळाडूंने मारली बाजी

On: सोमवार, डिसेंबर 12, 2022 5:42 PM
jos buttler
---Advertisement---

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांच्या संघाचे नेतृत्व करणारा जोस बटलर याने सोमवारी (12 डिसेंबर) मोठा मान मिळवला. आयसीसी प्रत्येक महिन्यात ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरुस्कार जाहीर करत असते. सोमवारी त्यांनी नोव्हेंबर महितन्यातील जोस बटलरच्या प्रदर्शनाची दखल घेत त्याला हा पुरस्कार घोषित केला. 

नोव्हेंबर महिन्यात आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी जोस बटलर (Jos Buttler), आदिल राशीद (Adil Rashid) आणि शाहीन शाह अफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांना नामांकने मिळाली होती. सोमवारी बटलरने त्याचा सहकारी खेळाडू आदिल राशीद आणि पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना मागे टाकत पुरस्कार पटकावला. इंग्लंडने यावर्षी जोस बटलरच्या नेतृत्वात आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला. बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंडने तब्बल 12 वर्षांनंतर हा विश्वचषक जिंकला असून यासाठी त्याने स्वतः देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले.

https://twitter.com/ICC/status/1602213925525008385?s=20&t=bqLc1FeHrhmvL0pfQKgY2g

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभूत झाला होता. या उपांत्य सामन्यात 49 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या होत्या. जोस बटलरने या सामन्यात एलेक्स हेल्ससोबत मिळून 170 धावांची भागीदारी पार पाडली होती. तसेच अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध त्याने महत्वाच्या 26 धावांचे योगदान दिले होते. तत्पूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीला 47 चेंडूत 73 धावा केल्या होत्या. “हा पुरस्कार जिंकणे माझ्यासाठी मोठी सन्मानाची बार आहे,” अशी प्रतिक्रिया बटलरने दिले आहे. यावेळी त्याने चाहते आणि संघातील सर्व सहकारी खेळाडूंचे देखील आभार मानले.

https://twitter.com/ICC/status/1602217683961151488?s=20&t=uH9CWKh1zdt5z_TfZ4u6nA

महिला क्रिकेटचा विचार केला, तर पाकिस्तानची सिदरा अमीन (Sidra Ameen) नोव्हेंबर महिन्यात आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ ठरली आहे. सिदराने आयर्लंडची गॅबी लुईस आणि नत्थाकन चाँथम यांना मागे टाकत पुरस्कार पटकावला आहे. नामांकन मिळालेल्या या सर्व खेलाडूंना नोव्हेंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. (Jos Buttler named ICC ‘Player of the Month’)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडपुढे पाकिस्तान पुन्हा नतमस्तक! मुलतान कसोटीतही दिसली बझबॉलची जादू
जो रुटने केला महापराक्रम, बनला कसोटी क्रिकेटमध्ये ‘असे’ करणारा तिसरा खेळाडू 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---