भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत उर्वरित इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) २०२१ सामन्यांबद्दल नियोजन करण्यात आले. आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये होणार असून उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत खेळवण्यात येतील. दरम्यान परदेशी खेळाडू उपलब्ध असतील का? याबाबत अजूनही कुठल्याही परदेशी क्रिकेट बोर्डाने माहिती दिलेली नाही.
आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होणार असून यावेळी सगळ्याच परदेशी संघांचे वेळापत्रक व्यस्त आहे. याच काळात इंग्लंडचा संघ बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंग्लंड संघाचा तडाखेबाज यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला आयपीएल २०२१ मध्ये खेळण्यास अडचण येऊ शकते. बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो.
द टेलिग्राफशी बोलताना बटलर म्हणाला की, “सहसा आयपीएलचे वेळापत्रक आणि आंतरराष्ट्रीय सामन्याचे वेळापत्रक कधीही एकाच वेळी येत नाही. त्यामुळेच आयपीएलची स्पर्धा खेळणे सोपे जाते. परंतु, यावेळेस तसे नाही. इंग्लंड संघ कदाचित सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. त्यामुळे आयपीएल आणि या आंतरराष्ट्रीय मालिकेचे वेळापत्रक जुळून आले तर माझे पहिले ध्येय इंग्लंडसोबत खेळेन हेच असेल.”
बटलरच्या अनुपस्थित राजस्थान संघाला खूप अडचणी येऊ शकतात. यंदाच्या आयपीएलमध्ये बटलर तगड्या फॉर्ममध्ये होता. तसेचत्याने शतक सुद्धा झळकावले होते. म्हणून आता कर्णधार संजू सॅमसन समोर एक मोठे प्रश्नचिन्ह असेल की, सलामीला कोणाला खेळवावे. बटलर एक अनुभवी फलंदाज असून पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या सामन्याचे स्वरूप बदलण्याची त्याचाकडे कुवत आहे. त्यामुळे राजस्थान संघाला बटलर नसल्यामुळे जबरदस्त फटका बसणार आहे.
बटलरने आजवर ६५ आयपीएल सामन्यात ३५.१च्या सरासरीने १९६८ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ११ अर्धशतक आणि १ शतक मारले आहे. बटलरने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पावसाच्या व्यत्यानंतर सर्वांना राखीव दिवशी सामना होण्याची आस, पण अंतिम निर्णय होणार ‘या’दिवशी
WTC अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पंत सपशेल फ्लॉप, केली ३ वर्षांपुर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती
सोडा-चखण्याचा बंदोबस्त झालाय! सिराजच्या ‘त्या’ फोटोमुळे गुरुजींवरही बनले भन्नाट मीम्स