इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज जोस बटलर हा भारतात देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. जोस बटलर इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. बटलरने नुकतेच राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांचा त्याच्या क्रिकेटपटू बनण्यात कसा वाटला होता हे सांगितले आहे.
जेव्हा इंग्लंडमध्ये 1999 चा विश्वचषक खेळला गेला तेव्हा बटलर 9 वर्षांचा होता. त्याने या दोघांनाही विश्वचषकात फलंदाजी करताना पाहिले होते. बटलरने 1999 च्या भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या विश्वचषक सामन्याची आठवण सांगितली आहे. ज्या सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी शतक ठोकले होते. टॉन्टन काउंटी मैदानावर हा सामना खेळला गेलेला होता.
त्या सामन्यात अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या श्रीलंकेचा भारतीय संघाने 157 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत बटलर म्हणाला, ‘ती माझी आवडती वर्षे होती. त्या सामन्यात द्रविड आणि गांगुलीच्या शतकाचा माझ्यावर मोठा परिणाम झाला होता. त्या सामन्यात मी प्रथमच भारतीय चाहत्यांमधील क्रिकेटची आवड बघितली होती. मग मी विचार केला की भारतात विश्वचषक खेळणे किती उत्साहवर्धक असेल.
बटलर सांगत असलेल्या सामन्याबद्दल विचार केला असता, त्या सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी 318 धावांची शानदार भागीदारी केली होती. गांगुलीने 183 आणि द्रविडने 145 धावा केल्या होत्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध 373 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ 42.3 षटकांत 216 धावांवरच गारद झाला व भारताने सहजरित्या विजय मिळवला होता. निश्चितच बटलरच्या या अनुभवातून त्याचे भारतीय क्रिकेटबद्दल असलेले प्रेम व आवड दिसून येते. बटलरच्या चाहत्यांना तो आगामी काळात न्युझीलंड विरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत मैदानात खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: अवघ्या १० धावांवर १० विकेट्स, त्यातही हॅट्रिक घेणारे अवलिया; वाचा त्यांच्याविषयी
कसोटी चॅम्पियनशीप फायनल अनिर्णीत किंवा ड्रॉ झाली तर कोण असणार विजेता? घ्या जाणून
“ही पहिली पायरी आहे, आशा आहे की यानंतर तरी भारत आणि पाकिस्तानमधील नातेसंबंध सुधारतील”






